महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालयात प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन प्रेरणा दिन साजरा
Reading Inspiration Day Celebrated, Satara, Karad, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा कराड प्रतिनिधी

वाचन प्रेरणा दिनानिमित्त गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार ‘वंदे मातरम्’ गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त श्री. मिलिंद सबनीस लिखित पुस्तकातील मजकुराचे वाचन करण्यात आले. तसेच शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता ‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. महाविद्यालयातील आयक्यूएसी (IQAC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), ग्रंथालय आणि भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. सुखदा विदार उपस्थित होत्या.

प्रा. सुखदा विदार यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी शैलीत वाचनाचे महत्त्व, मानवी जीवनातील वाचनाचे स्थान आणि वाचन संस्कृती जोपासण्याची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मोबाईलवरील सततचे स्क्रोलिंग आणि पुस्तकांचे वाचन यांमधील मूलभूत फरक स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थिनींना नियमित वाचनाची सवय लावून घेण्याचे आवाहन केले. भाषा, विचार आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यासाठी वाचन कसे उपयुक्त ठरते, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू, संत साहित्याचे महत्त्व तसेच विविध साहित्यकृतींचा परिचय करून दिला. ‘छोटी कल्पना’, ‘डॅमिट आणि बरंच काही’, ‘जावई बापूंच्या गोष्टी’, ‘बॅरिस्टरचं कार्ट’, ‘समिधा’, ‘इराणीगाथा’ आणि ‘गोफ जन्मांतरीचे’ यांसारख्या पुस्तकांचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थिनींना पुस्तक वाचनाची गोडी लावण्यासाठी प्रेरित केले. वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, व्यक्तिमत्त्व विकसित होते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला प्रशासकीय समन्वयक डॉ. अखिलेश शिंदे, इंग्रजी विभागप्रमुख प्रो. डॉ. उज्ज्वला ताठे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. पराग सोनटक्के, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास सुर्वे यांनी केले. श्रीमती वैशाली सुभेदार यांनी प्रमुख वक्त्या प्रा. सुखदा विदार यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रुपाली भोसले यांनी केले, तर प्रा. रेखा धुळप यांनी आभार मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास आणि महाविद्यालयात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यास निश्चितच प्रेरणा मिळाली.
     -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !