फोंडशिरस कुंभारमाळा येथील वीजप्रश्न मार्गी - राहुल वाघमोडे यांच्या पाठपुराव्याला यश!

नवीन डीपी बसवून वीजपुरवठा पूर्ववत; ग्रामस्थांसह शेतकरी बांधवांना मोठा दिलासा
Power supply restored after installation of DP (Distribution Transformer), rahul waghmode, malshiras, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (राहुल तनपुरे)
फोंडशिरस (कुंभारमाळा) गेल्या आठ दिवसांपासून खंडित झालेला कुंभारमाळा परिसरातील वीजपुरवठा अखेर पूर्ववत झाला आहे. ट्रान्सफॉर्मर (डीपी) जळाल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत राहुल दादा वाघमोडे यांनी संबंधित महावितरण विभागाकडे तातडीने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर अवघ्या दोन दिवसांत नवीन डीपी बसविण्यात आल्याने परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आठ दिवस अंधारात; शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
कुंभारमाळा परिसरातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. वीज नसल्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणी येत होत्या. तर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे, शेतीची कामे करणे तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे कठीण झाले होते. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांकडून वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी होत होती.

राहुल वाघमोडे यांचा तत्पर पाठपुरावा
परिसरातील ग्रामस्थांनी ही समस्या राहुल वाघमोडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे नवीन डीपी बसविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आणि वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.

समस्या समजताच तत्परतेने पाठपुरावा करून ती मार्गी लावल्यामुळे कुंभारमाळा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने शेतीच्या कामांना गती मिळण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत झाली आहे.

"जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य!"
"जिथे समस्या, तिथे मदतीचा हात… जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य!" या भावनेतून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण नेहमी तत्पर असल्याचे राहुल दादा वाघमोडे यांनी सांगितले.
कुंभारमाळा परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या वेळेत मार्गी लागल्यास त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला होतो, याचे हे उदाहरण मानले जात आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !