दीनबंधू मित्र मंडळाचा गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक व कामगार गौरव सोहळा उत्साहात
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - दीनबंधू मित्र मंडळ, भुईंज यांच्या वतीने दसऱ्यानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव यांना ‘भुईंज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवृत्त कर्नल अभयसिंह विजयसिंह पिसाळ-देशमुख आणि डीवायएसपी पूनम झगडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्य आर. एस. पाटील, मंडळाचे अध्यक्ष सुनील शेवते आणि उद्योजक प्रशांत भोसले-पाटील उपस्थित होते.
महात्मा फुले सभागृह, फुलेनगर, भुईंज येथे झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारितोषिके देण्यात आली. मंडळाच्या वतीने आयोजित वक्तृत्व व निबंधलेखन स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच परिसरातील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक आणि आदर्श कामगारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कर्नल अभयसिंह पिसाळ-देशमुख आणि डीवायएसपी पूनम झगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांतून देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव दत्तात्रय शेवते यांनी केले. यावेळी विनोद बनकर, सचिन शेवते, अमोल शेवते, अमित लोखंडे, योगेश दगडे, संदीप जायकर, संजय बोराटे, सयाजी दगडे, सौ. अंजना विठ्ठल शेवते, सतीश फरांदे, अमोल बनकर, अर्चना बाबासाहेब झोरे, सुवर्णा राजेंद्र दगडे, राहुल शेवते आदी उपस्थित होते. ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











