पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचार - भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत मतदारांना मतदानाचे आवाहन
Teacher constitution election, kaustubh gawade, pune, Chandrakant Patil, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पुणे (फैजल पठाण)
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांनी मतदानासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच मतदान करण्याचे आवाहन केले.

भाजप-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व याबाबत मतदारांशी संवाद साधत भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारातील सक्रिय सहभागाचे मतदारांनी कौतुक केले. तसेच, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !