अजितदादांच्या स्मृती आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनांमुळे मकरंद आबा पाटील वाढदिवस साजरा करणार नाहीत

सत्कार , हारतुरे टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे कार्यकर्ते व हितचिंतकांना आवाहन

No birthday celebration, Minister Makarand Aba Patil, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृती आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या वेदनांची जाणीव ठेवून, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २९ ऑक्टोबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त मोठे सत्कार, हारतुरे आणि अनावश्यक खर्च टाळून गरजू नागरिकांना मदत करावी, तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांना केले आहे.

अजितदादांच्या अकाली निधनामुळे मन व्यथित झाले असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना ना. मकरंद पाटील यांनी व्यक्त केली. दादांचे मार्गदर्शन, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली तळमळ आणि जनहितासाठी अहोरात्र काम करण्याची वृत्ती सदैव प्रेरणा देत राहील, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष करण्याऐवजी संकटग्रस्तांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांना शक्य ती मदत करणे आणि गरजूंच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकनेते अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या लोकसेवेचा विचार आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करण्याचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ना. मकरंद पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शेतकरी बांधवांना मदत करावी, गरजू नागरिकांना सहकार्य करावे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.

“माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा आनंद सत्कारात नाही, तर गरजू माणसाच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या समाधानात आहे,” अशी भावना व्यक्त करत ना. मकरंद पाटील यांनी आजवर प्रेम, विश्वास आणि भक्कम पाठबळ दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचे आणि नागरिकांचे आभार मानले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सर्वांनी सत्कार व हारतुरे टाळून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
        -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !