भुईंज विद्यालयात आंतरवासिता उपक्रमांचा उत्साह, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, हस्ताक्षर स्पर्धा अन् पर्यावरण संवर्धनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास 
Inter-residential activities,Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे) 

वाई - रयत शिक्षण संस्थेच्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शालेय आंतरवासिता टप्पा २’ अंतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासह त्यांच्यात सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याचा उद्देश या उपक्रमांतून साध्य करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, नागपंचमीनिमित्त मेहंदीचे कोन तयार करण्याची कार्यशाळा, आनंददायी शनिवार, आठवडी बाजार, विज्ञान प्रदर्शन आणि चित्ररंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेचे आणि कौशल्यांचे दर्शन घडविले. गोपाळकाला व पोषण सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली उपस्थितांची मने
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांत समूहगीत, सिंहगर्जना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि नाटिका सादर करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक फुले तयार करण्याची कार्यशाळाही घेण्यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश; पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वतः बीजगोळे (सीडबॉल) तयार केले. या बीजगोळ्यांचा उपयोग वृक्षसंवर्धनासाठी केला जाणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी परिसरातील ‘आपुलकी’ या विशेष मुलांच्या शाळेला सदिच्छा भेट देऊन सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय दिला.

मान्यवरांचे मार्गदर्शन, शिक्षक व छात्र अध्यापकांचा सक्रिय सहभाग
या उपक्रमांसाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव, विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक ढाणे, पर्यवेक्षिका विद्या आदलिंगे, समन्वयक व्ही. जे. नवले, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या व्ही. एस. नलवडे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. धोंडगे, गट मार्गदर्शक डॉ. एस. एस. टेळे आणि आंतरवासिता विभागप्रमुख प्रा. रवलेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बी.एड. छात्र अध्यापक यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या कलागुणांना, सामाजिक जाणिवांना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली.
      -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !