भुईंजमध्ये रंगला व्हॉलिबॉलचा महासंग्राम

आझाद हिंद मंडळाच्या स्पर्धेत सोलापूर पोलीस अजिंक्य
Hollywood tournament, winner, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - शारदीय नवरात्रोत्सवाचा भक्तिमय माहोल आणि मैदानात प्रत्येक पॉईंट, अचूक सर्व्हिस व जोरदार स्मॅशवर उडालेला भुईंजकरांचा जल्लोष, अशा अभूतपूर्व थरारात येथील आझाद हिंद मंडळ आयोजित भव्य व्हॉलिबॉल स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात संपन्न झाल्या. 

राज्यभरातून आलेल्या नामांकित संघांच्या अटीतटीच्या झुंजीत आपल्या शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळाच्या जोरावर सोलापूर पोलीस व्हॉलिबॉल संघाने या भव्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावत मानाचा प्रथम क्रमांक आपल्या नावावर केला.
अंतिम सामन्यात सोलापूर पोलीस आणि कोरेगाव-सांगली संघादरम्यान प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी लढत पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांत प्रत्येक गुणासाठी प्रचंड चढाओढ सुरू होती. मात्र, मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट ताळमेळ आणि वेगवान हालचालींच्या बळावर सोलापूर पोलिसांनी सामन्यावर वर्चस्व राखले. 

झुंजार खेळ सादर करणाऱ्या कोरेगाव (सांगली) व्हॉलिबॉल संघाने स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या सामन्यात शारदानगर, बारामती व्हॉलिबॉल संघाने बाजी मारली, तर आपल्या वेगवान खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या बीडीडीएस, पुणे व्हॉलिबॉल संघाने स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला.

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून घेतलेल्या या स्पर्धेने भुईंजच्या उत्सवात वेगळाच रंग भरला. भुईंजसह पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींनी शिवाजी मैदानात प्रचंड गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सामन्यांना ग्रामस्थांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अभूतपूर्व होता. खेळाडूंच्या प्रत्येक डाईव्ह आणि ब्लॉकवर टाळ्यांचा गजर करत प्रेक्षकांनी खेळाडूंचे मनोबल वाढवले.

माजी आमदार मदन भोसले, पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे, गट विकास अधिकारी नारायण घोलप, भैय्यासाहेब जाधवराव, सरपंच विजय वेळे, उपसरपंच शुभम पवार, किसनवीर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार निकम,वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे, श्रीकांत भोसले, सुधीर भोसले पाटील,यशराज भोसले रमेशशेठ चिकणे,नारायण नलवडे,विशाल भोसले,भरत भोसले,अभिजीत जाधव (राणे)दत्ताञय शेवते,जयवंत पिसाळ,सुजय शेवते,अमोल दिक्षीत,विजय चव्हाण सचिन इथापे,प्रल्हाद जाधव,मल्हारी शेळके,डॉ.संदीप सहाणे, ग्रामपंचायत,सोसायटी, देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य सर्वपक्षीय राजकीय नेते, शासकीय अधिकारी विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थिती लावली.

खेळाच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणणे आणि गावातील क्रीडा संस्कृतीला पुनरुज्जीवित करणे ही काळाची गरज असून, आझाद हिंद मंडळाने उभारलेला हा क्रीडा मंच अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी आपल्या भाषणात काढले.

राज्यभरातील आलेल्या दिग्गज संघांचे आदरातिथ्य मैदानावरील प्रकाशझोताची उत्तम सोय आणि शिस्तबद्ध सामने यांमुळे स्पर्धा अत्यंत देखणी ठरली. या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आझाद हिंद मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र वारागडे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मान्यवरांसह ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम फलद्रूप ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !