श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सजले रंगीबेरंगी फुलांनी! सावळ्या विठुरायाचे मनमोहक रूप

दसऱ्यानिमित्त पंढरपुरात मनमोहक पुष्प सजावट
Shri Vitthal Rukmini Temple, flower decoration, vijayadashmi, Dasara, dashahara, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पवित्र विजयादशमी (दसरा) सणाचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची व आकर्षक पानांची मनमोहक सजावट करण्यात आली आहे. या सुबक आणि भव्य पुष्प सजावटीने विठ्ठल-रुक्मिणीचे रूप अधिकच खुलले असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे डोळे दीपून जात आहेत.

विविध देशी-विदेशी फुलांची आकर्षक मांडणी
मंदिरात करण्यात आलेल्या या विशेष सजावटीसाठी झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ऑर्किड, अँथुरियम, कार्नेशन, सूर्यफूल, तगर, गुलछडी, लक्ष्मी कमळ, ब्लू डेझी आणि पिंक डेझी यांसारख्या विविध प्रकारच्या सुगंधित व रंगीबेरंगी फुलांचा वापर करण्यात आला आहे. फुलांसोबतच जिप्सोफिला, कमिनी, अशोकाची पाने, मनीप्लांट आणि ड्रॅसिना यांसारख्या शोभिवंत पानांच्या साथीने सजावटीची शोभा आणखी वाढवली आहे. फुलांची ही कलाकुसर आणि सुबक रचना पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

भाविकांसाठी पर्वणी
दसरा सणानिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे. गाभारा आणि मंदिर परिसरात केलेली ही आकर्षक पुष्प सजावट भाविकांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरत असून, अनेक भाविक या नयनरम्य दृश्याची छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त करताना दिसत आहेत.

सेवाभावी तत्त्वावर सजावट
ही आकर्षक पुष्प सजावट पुणे येथील प्रसिद्ध पुष्प सजावटकार राम जांभुळकर यांनी पूर्णपणे सेवाभावी तत्त्वावर व विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. याविषयी माहिती देताना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी जांभुळकर यांच्या या धार्मिक व सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !