गणपती आळीतील फुले चौकात मंगळवारी सकाळी ७.१५ वाजता सोहळा, शिवभक्तांसह नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई शहरातील गणपती आळी येथील फुले चौक, दत्त मंदिर परिसरात विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतन मूर्तीचा भव्य अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिवभक्ती, स्वाभिमान आणि मराठी अस्मितेचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याची तयारी करण्यात येत असून, मंगळवारी सकाळी ठीक ७.१५ वाजता अनावरण कार्यक्रम पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, स्वराज्याच्या विचारांचा आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला गणपती आळीतील सर्व आळीकर, समस्त शिवभक्त तसेच वाई शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बाल विठ्ठल मंडळ संघर्ष प्रतिष्ठान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वाई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. विशाल रामचंद्र मोरे यांनी नागरिकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचा तपशील- दिनांक: मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६- वेळ: सकाळी ७.१५ वाजता- स्थळ: फुले चौक, दत्त मंदिर, गणपती आळी, वाई- प्रमुख उपस्थिती: मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य नामदार मकरंद पाटील
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











