जयच्या मृत्यूने मन हेलावले, कुटुंबाच्या दुःखात आम्ही खंबीरपणे सोबत - खा. उदयनराजे भोसले

सोमवारी सर्व संबंधित प्रशासकीय आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची  बैठक
Child killed in leopard attack, MP udayanraje Bhosle, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
न्हाळेवाडी (ता. सातारा) येथील निष्पाप अन् चिमुकल्या जयवर बिबट्याने अचानक केलेल्या निर्घृण हल्ल्यात त्याचा करुण अंत झाला. या बातमीने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला असून न्हाळेवाडीसह परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरले आहे. एका निष्पाप बालकाचा असा दुर्दैवी बळी गेल्याने सर्वसामान्यांमधून प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या हृदयद्रावक घटनेची तात्काळ दखल घेत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तीव्र दुःख व्यक्त करत पीडित कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच उदयनराजे भोसले यांनी अत्यंत संताप व वेदना व्यक्त केल्या. "चिमुकल्या जयच्या अशा अचानक जाण्याने मन सुन्न आणि हेलावून गेले आहे. कोणत्याही आई-वडिलांसाठी आपल्या डोळ्यांसमोर असा पोटचा गोळा गमावणे यापेक्षा मोठे दुःख असू शकत नाही. या दुःखाच्या डोंगराखाली भरडल्या गेलेल्या जयच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वतोपरी खंबीरपणे उभे आहोत. त्यांना या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी प्रशासकीय व वैयक्तिक पातळीवर सर्व ती मदत केली जाईल," असा धीर उदयनराजे यांनी दिला.

या हृदयद्रावक घटनेनंतर जयच्या कुटुंबीयांसह न्हाळेवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि भीती जाणून घेतली. त्यानंतर वन विभाग, महावितरण, पोलीस विभाग तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीच्या उपाययोजनांबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

‘आता केवळ आश्वासन नको, ठोस कार्यवाही हवी’, अशी भूमिका उदयनराजे यांनी यावेळी स्पष्ट केली. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्ष आणि परिणामकारक कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत उदयनराजे यांनी तातडीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, उद्या संबंधित सर्व विभागांच्या
 अधिकाऱ्यांची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीस ग्रामस्थांसोबत स्वतः उपस्थित राहून त्यांच्या अडचणी, भीती आणि मागण्या प्रशासनासमोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला आहे. त्यामुळे या घटनेकडे केवळ एक दुर्दैवी दुर्घटना म्हणून पाहता येणार नाही. परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

गरज भासल्यास राज्यातील तसेच केंद्रातील संबंधित मंत्र्यांशी स्वतः संपर्क साधून आवश्यक मदत आणि उपाययोजनांसाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

जयच्या कुटुंबाचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या दुःखाच्या काळात आम्ही केवळ सहवेदना व्यक्त करून थांबणार नाही, तर कुटुंबाच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि न्हाळेवाडी व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !