“आये है तेरे दरपे, कुछ करके उठेंगे, या तो वस्ल हो जायेगा, या फिर मरके उठेंगे...” अशा कडक आणि प्रबोधनात्मक शायरीच्या सुरांनी नागपूरचे रवीभवन दुमदुमून गेले. देशातील आणि जगातील तळागाळातील, आदिवासींच्या तसेच गोरगरीब व दीनदुबळ्यांच्या संवैधानिक हक्कांसाठी अविरत कार्यरत असणाऱ्या ‘केंद्रीय मानवाधिकार संघटन, नई दिल्ली’च्या वतीने आयोजित १५ व्या स्थापनादिन, ‘दैनिक मानवाधिकार समाचार’चा वर्धापन दिन आणि संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. मिलिंद दहिवाले यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने पार पडलेल्या केंद्रीय मानवाधिकार अधिवेशनात संघटनचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांना ‘केंद्रीय मानवाधिकार रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नागपूर येथील ‘रवीभवन’ येथे ११ ऑक्टोबर २०२६ रोजी हा भव्य अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
आपल्या साहित्यिक प्रतिभेने, कवी संमेलनातील प्रभावी गायकीपूर्ण शैलीने आणि संवेदनशील सामाजिक कार्याने ॲड. डॉ. कस्तुरे यांनी संपूर्ण देशभरात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच दीर्घकालीन सामाजिक सेवेची दखल घेऊन त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार संघटनचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. मिलिंद दहिवाले, राष्ट्रीय विधी सल्लागार व राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. अमान मारकर, राष्ट्रीय प्रबोधनकार व राष्ट्रीय सचिव अजय पत्रे, आणि राष्ट्रीय संघटन सचिव मा. डॉ. बबनराव महामुने यांच्या शुभहस्ते ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना संघटनचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. मिलिंद दहिवाले आणि इतर मान्यवरांनी स्पष्ट केले की, देशात कुठेही अन्याय, अत्याचार किंवा मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास केंद्रीय मानवाधिकार संघटन पीडितांना तत्परतेने कायदेशीर व सामाजिक सहकार्य करेल. यावेळी संघटनच्या भविष्यातील कामकाजाची रूपरेषाही विशद करण्यात आली.
या अधिवेशनाला देशभरातील विविध राज्यांतील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











