लालवण शिवारात ५३ लाखांचा बेकायदेशीर गांजा जप्त - पिशोर पोलिसांची धडक कारवाई

तब्बल ५२ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीची गांजाची झाडे हस्तगत
Cannabis smuggler arrested, police rapid action, pishor, kannad, Chhatrapati Sambhaji Nagar, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा , फुलंब्री (तातेराव बनसोडे)
पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालवण येथील पाडळी एकफाटा शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीररीत्या लावलेला लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. शेतात छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५२ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीची गांजाची झाडे हस्तगत केली असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून टाकला छापा
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, लालवण येथील पाडळी एकफाटा शिवारातील शेत गट क्रमांक २८ मध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आली होती. या माहितीच्या आधारे पिशोर पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी घटनास्थळी अचानक छापा टाकला.

१४१ झाडे आणि १०५ किलो वजन
छाप्यादरम्यान पंचांच्या समक्ष शेतातील गांजाच्या झाडांची मोजणी व जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एकूण १४१ गांजाची झाडे जप्त केली, ज्यांचे एकूण वजन १०५.१५ किलोग्राम भरले. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची बाजारभाानुसार अंदाजित किंमत ५२ लाख ९७ हजार ५०० रुपये आहे.

संशयिताला अटक, गुन्हा दाखल
या प्रकरणी शेतमालक आरोपी चैनसिंग रतनसिंग बिमरोटे (वय ६६ वर्षे, रा. लालवण, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) अन्वये पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) कुणाल सूर्यवंशी करत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत स्वामी आणि कन्नड उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहभागी अधिकारी, कर्मचारी
कारवाईच्या वेळी कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आरती पवार यांच्या उपस्थितीत, सपोनि कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सफौ गजानन कराळे, पोलीस हवालदार दराडे, कैलास करवंदे, दत्तू लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कव्वाल, कौतिक सपकाळ, पवन खंबाट, कृषी सहाय्यक नवनाथ खिल्लारे, SDPO कार्यालयातील आय-बाईक अंमलदार जोनवाल, होमगार्ड नितीन शिंदे, गजानन सोनवणे तसेच कन्नड येथील फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने विशेष सहभाग नोंदवला.


-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !