डांगे कॉलनी, लाखानगर आणि यशवंतनगर परिसरात शोककळा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
ग्रामपंचायत यशवंतनगरचे माजी सदस्य, वाई जनता अर्बन बँकेचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते कै. विजय दिनकर भोसले (रा. डांगे कॉलनी, वाई) यांचे रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने डांगे कॉलनी, लाखानगर आणि यशवंतनगर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
विजय भोसले यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले होते. तसेच वाई जनता अर्बन बँकेत अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कै. विजय भोसले यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना डांगे कॉलनी, लाखानगर व यशवंतनगर येथील ग्रामस्थ तसेच मित्रपरिवाराने व्यक्त केली आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











