राष्ट्रीय महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून १.५५ कोटींचा दरोडा

सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ तासांत ८ दरोडेखोर जेरबंद!
A stellar performance by the police, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर पुण्यावरून कोल्हापूरकडे सोन्या-चांदीचे दागिने अन् चांदीच्या विटा घेऊन जाणाऱ्या कूरियर कंपनीच्या पिकअप वर थरारक आणि फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. कोयत्याचा धाक दाखवून तब्बल १ कोटी ५५ लाख २७ हजार २९८ रुपये  रोकड आणि इतर ऐवज लूटणाऱ्या ८ दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे सातारा पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता 'मार्क एक्सप्रेस कुरिअर कोल्हापूर' कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-09-FL-5423) पुण्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. आरोपींनी खेड शिवापूर व कापूरहोळ टोलनाक्यापासून ३ मोटारसायकलवरून  या गाडीचा पाठलाग सुरू केला.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर वाई तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीत आरोपींनी पिकअपला गाडी आडवी मारून थांबवले. त्यानंतर चालकाला कोयत्याचा धाक दाखवत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. गाडीचा पाठीमागील दरवाजा उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व चांदीच्या विटा असलेले पोते बळजबरीने चोरून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींपैकी गोपीनाथ तानाजी कदम (रा. मालगाव) हा कराड येथील एका कूरियर कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याला मार्क एक्सप्रेसच्या गाड्यांच्या वेळा आणि मौल्यवान ऐवजाबाबत पूर्ण माहिती होती. १६ ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीचे दागिने घेऊन जाणारी गाडी पुण्यावरून निघाल्याची पक्की बातमी गोपीनाथने त्याचा साथीदार मंगेश जाधव याला दिली.

त्यानंतर गोपीनाथ कदम, मंगेश जाधव, ऋतिक कदम, आदित्य कदम, सोमनाथ गोडसे, निखिल कदम, अक्षय मोझर (सर्व रा. मालगाव) आणि निषिध साबळे (रा. शिवथर) यांनी दरोड्याचा प्लॅन आखला. प्लॅननुसार पल्सर, युनिकॉन आणि होंडा शाईन या तीन गाड्यांवरून पाठलाग करत त्यांनी कवठे येथे गाडी अडवून दरोडा टाकला.

घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व सुनील साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली.

CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असतानाच, पोलीस निरीक्षक घोडके यांना गुप्त बातमीदाराकडून मालगाव येथील मंगेश जाधव, ऋतिक कदम व सोमनाथ गोडसे यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थागुशाच्या पथकाने तात्काळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून दरोड्यातील १,५५,२७,२५८ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा जप्त केल्या.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, पो.नि. विश्वजीत घोडके, स.पो.नि. पृथ्वीराज ताटे, सुशील भोसले, अभिजित यादव, रोहित फार्णे, पो.उ.नि. परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, सुरज शिंदे, आकाश मोरे  स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार अतिष घाडगे, राजू मुलाणी, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळूंखे, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, नवनाथ कदम,  राकेश खांडके, हसन तडवी, सनी आवटे, अजय जाधव, सुजित भोसले, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, स्वप्नील शिंदे, किरण जगताप, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, महेश निर्मळ, स्वप्नील लोखंडे, इरफान मुलाणी, संकेत निकम, संजय जाधव, अमृत कर्पे, विजय निकम, आनंदा भोये, महेश जाधव, शकुंतला सणस, आदिका वीर भुईंज पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे  पोलीस अधीक्षक सातारा निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉ.वैशाली कडुकर ,  उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा उपविभाग विपुल पाटील व  उपविभागीय पोलीस अधिकारी वाई उपविभाग सुनिल साळुंखे यांनी अभिनंदन केले आहे.
      -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !