शिक्षक परिषदेच्या पाठिंब्यामुळे डॉ. रोंगे सरांच्या विजयाची समीकरणे सोपी

शिक्षक परिषदेचे संघटनात्मक जाळे डॉ. रोंगे सरांच्या मदतीला!
Support from the Teachers' Council, shikshak parishad, dr.B.P. ronge, teacher constitution election,pune, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
पुणे- 'महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राज्यव्यापी शिक्षकांसाठी लढणारी संघटना आहे. शिक्षण क्षेत्रातील समस्यांसाठी लढणारी ही संघटना राष्ट्रहितासाठी कार्य करते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच पुणे विभागाचा विचार केला तर ५८ तालुक्यात ही परिषद पोहोचली आहे. 'जिथे शिक्षक तिथे शिक्षक परिषद' आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आत्तापर्यंत महाराष्ट्रात सतरा उमेदवार अर्थात सतरा आमदार निवडून दिलेले आहेत आणि शिक्षण परिषदेने निवडून दिलेले सर्व आमदार हे चारित्र्य संपन्न आहेत आणि समाजाची जाण असणारे प्राध्यापक, प्राचार्य, आयआयटीयन पासून ग्रामीण भागातील उमेदवार शिक्षक परिषदेने दिले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारे उमेदवार शिक्षक परिषदेने आजपर्यंत दिलेले आहेत. चारित्र्य संपन्न उमेदवार म्हणून परिषदेने डॉ. रोंगे सरांची निवड केली आहे. पाठीमागील इतिहास पाहता यंदा डॉ. बी. पी. रोंगे सरांचा विजय निश्चित आहे म्हणून डॉ. रोंगे सरांना आम्ही पाठिंबा देत आहोत.' असे प्रतिपादन राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड यांनी केले.

पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभाग प्रमुख सुरेश राठोड माहिती देत होते. यावेळी सोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे महानगरचे कार्यवाह विष्णू मोरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पिंपरी चिंचवडचे प्रमुख अरुण देवकते आणि शिक्षण परिषदेचे जेष्ठ सदस्य शिवाजीराव भोसले आदी उपस्थित होते. यावेळी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे सर म्हणाले की,'मी जवळपास मागील दीड वर्षापासून म्हणजे ज्यावेळी पुणे विभाग शिक्षक निवडणूक जवळ आल्याची चाहूल लागली तेंव्हापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांत असलेल्या शाळा,  महाविद्यालयांमधील शिक्षकांशी प्रत्यक्ष भेटीगाठीच्या माध्यमातून संवाद साधत आलोय. त्यानंतर कोणतेही शिक्षक, प्राध्यापक हे रजिस्ट्रेशन (नोंदणी)पासून दूर राहिला नाही पाहिजे यासाठी आमच्या यंत्रणेने रजिस्ट्रेशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत मेहनत घेतली. त्यातून हजारो शिक्षकांचे रजिस्ट्रेशन केले आहे. 

शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, संस्थापक आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. या सर्वांमधून शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आणि मला शिक्षकांच्या समस्या समजल्या. सर्वांतून एकच सांगतो की प्रामाणिक प्रयत्न केल्यास, प्रचंड जिद्द असेल तर कितीही अवघड काम पुर्णत्वाला जाऊ शकते. यासाठी मी निवडणूक लढवण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने सर्व शिक्षकांच्या प्रेमाने आणि त्यांच्या पाठिंब्याने मी विजयी होणार असून त्यांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही देतो.' असे सांगून त्यांनी आपले दीर्घ विचार प्रकट केले. पुढे बोलताना सुरेश राठोड म्हणाले की, 'शिक्षक परिषदेने पाचही जिल्ह्यांत जाऊन चाचपणी केली असून सासवडला यासाठी मोठा निर्धार मेळावा भरवला होता. एकूणच पक्ष विरहित कार्य असताना शिक्षक परिषदेच्या पाठबळावर ताकत वाढवत आहोत. परिषदेच्या वतीने केलेल्या नोंदणीतील वैचारिक धारा संपन्न असणारे १५ हजार मतदार आहेत व डॉ. रोंगे सरांना वैयक्तिक ओळखणारे २२ हजार मतदार आहेत म्हणजे एकूणच याच ठिकाणी डॉ. रोंगे सरांचा विजय निश्चित आहे.' असे सांगून त्यांनी परिषदेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. 'पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणार्‍या मतदानासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले असून या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घटनाक्रम पाहण्यात येत आहेत. 

पुणे विभागात १५ हजार शिक्षक संलग्न असलेल्या 'महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने' आणि शिक्षक संघटनातील धुरिणांनी आणि परिवाराने प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सर यांना जाहीर पाठींबा दिल्याने डॉ. रोंगे सरांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर आणि प्रशस्त होताना दिसत आहे. स्वच्छ चारित्र्य, स्वेरीसारखं उभं केलेलं विकासात्मक मॉडेल, चाळीस वर्षे शिक्षणक्षेत्रात जपलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या अकॅडेमीक कौन्सिल, मॅनेजमेंट कौन्सिल, सिनेट या स्तरावर घेतलेल्या विविध जबाबदाऱ्या यामुळे प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी निवडणुकीमध्ये शिक्षक ते शिक्षक आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. 

डॉ. रोंगे सर यांच्या विजयासाठी अनेक हितचिंतक, माजी विद्यार्थी संघटना आणि सर्व परिवार झटून कामाला लागल्याने जबरदस्त अंडर करंट असल्याचे दिसून येत आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार प्रा. डॉ. बी. पी. रोंगे सरांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेली हरकत, तरीही तो अर्ज कायम ठेवण्यात त्यांना आलेले यश आणि आता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि वेगवेगळ्या संघटनांनी दिलेला मजबूत पाठिंबा आणि आतून काम करण्याचा दिलेला शब्द यामुळे डॉ. रोंगे सरांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. परिवाराचे पाठबळ, शिक्षक परिषदेची १५ हजार शिक्षकांची संघटनात्मक ताकद तसेच डॉ. रोंगे सरांचा २२ हजार शिक्षकांशी थेट संपर्क यामुळे प्रा. डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे सर यांच्या विजयाची समीकरणे सोपी झाली असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. एकूणच यंदाची ही शिक्षकांची निवडणूक डॉ. रोंगे सरांच्या पारड्यात विजयाची माळ टाकणार, हे स्पष्ट झाले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !