विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी देशी वृक्षांची लागवड
शिवशाही वृत्तसेवा,छ.संभाजीनगर ( मनोज चव्हाण)
पर्यावरण संवर्धनाचा मोलाचा संदेश देत, भावी पिढीला निसर्गाशी जोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय उंबरखेड तांडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शाळेचा परिसर हिरवाईने नटवा आणि विद्यार्थ्यांना बालपणापासूनच पर्यावरणाचे महत्त्व समजावे, या संकल्पनेतून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात विविध प्रकारच्या छायादार व उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. आमदार नितीन पाटील साहेब, सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य वाल्मीक निर्मळ, दिनकर पाटील निकम, संजय सोन्ने, अशोक मुरादे आणि आकाश रावसाहेब ढोणे यांच्या हस्तेही रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प करत वृक्षारोपण करण्यात आले.
झाडे केवळ लावणे पुरेसे नसून त्यांचे नियमित संगोपन आणि जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व सुंदर पर्यावरण निर्माण व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा वसा घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
या कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ शिक्षक मनोज चव्हाण, मुख्याध्यापक श्री. हाडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोमनाथ कर्डिले यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक श्री कारभारी सोळुंके यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
































