घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, तब्बल १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, चोरीचे सोने घेणाऱ्या सोनाराकडूनही दागिने हस्तगत

तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या, अकलूज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!
Habitual burglars arrested, solapur police, akluj, solapur, shivshahi news,

​शिवशाही वृत्तसेवा, अकलूज (वैभव कुलकर्णी)
अकलूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे धडाकेबाज कारवाई करत घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून घरफोडी व चोरीच्या विविध गुन्ह्यांतील १० लाख ९२ हजार २२० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

​दिनांक ८ व ९ ऑगस्ट २०२६ च्या दरम्यान मौजे इनामदारवस्ती, नेवरे (ता. माळशिरस) येथील फिर्यादी जितेंद्र जयंतराव इनामदार यांच्या बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवले होते. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, डम्प डेटा, सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर ॲनालिसिसच्या मदतीने तपास चक्रावली. या तपासादरम्यान संशयित आरोपी सागर दिलखुश काळे (वय ३६, रा. जळोळी, ता. पंढरपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आपले साथीदार आकाश उर्फ पप्पण्या संभाजी चव्हाण (वय ३५) व सूरज उर्फ दम्या रवी चव्हाण (वय २४, दोघे रा. पडसतळ, सांगवी, ता. पंढरपूर, मूळ रा. बादलकोट) यांच्या मदतीने नेवरे, यशवंतनगर आणि स्वरूपनगर परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली.

​आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने करकंब येथील ‘श्रीराम गोल्ड अँड सिल्व्हर पॅलेस’चा मालक शिवराज दीपक गोडसे याला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी लागलीच या सोनाराकडून ९ लाख ८२ हजार २२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

​फरार आरोपी आकाश चव्हाण व सूरज चव्हाण हे राहत्या घरी असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक त्यांना पकडण्यासाठी गेले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपींना १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​दुसऱ्या एका कारवाईत, अकलूज नवीन बस स्थानक येथे बसमध्ये चढताना एका प्रवाशाची पर्स मारून १ लाख १५ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा (गु.र.नं. ५७७/२०२६) दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या वडिलांनी १ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तपासासाठी हजर केले, जे पोलिसांनी जप्त केले आहेत.

​सदरची धडाकेबाज कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक (पंढरपूर विभाग) मा. श्रीमती प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. संतोष वाळके व अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस अंमलदार विनोद साठे, शिवकुमार मदभावी, राहुल रणनवरे, तुषार (बबलू) गाडे, दत्तात्रय खरात, अनुराधा आडगळे, सोमनाथ माने, पंडित गवळे, तुकाराम माने-देशमुख, विजय तवटे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे अजित सुरवसे व स्वप्निल जाधव यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई विशाल कदम करत आहेत.  
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !