वाई तालुका ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत ४५ किलो वजनी गटात पटकावला प्रथम क्रमांक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित पतित पावन विद्यामंदिर, ओझर्डे (ता. वाई ) येथील आपल्या रांगड्या क्रीडा संस्कृतीची आणि कुस्तीची वैभवशाली परंपरा जपणाऱ्या इयत्ता ९ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी हर्षवर्धन संदिप रायते याने आपल्या दैदिप्यमान कामगिरीने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कुस्तीच्या आखाड्यात आपले नाव चमकवले आहे.
वाई तालुका ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत ४५ किलो खालील वजनी गटात उत्कृष्ट खेळ करत त्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कुस्तीचे बाळकडू आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
हर्षवर्धनचे संपूर्ण कुटुंबच कुस्तीप्रेमी आहे. त्याचे चुलते आजोबा हे नामांकित पैलवान होते, तर त्याचे वडील संदीप रायते हे ओझर्डे तसेच वाई तालुक्यातील पंचक्रोशीत एक नामांकित पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हर्षवर्धनला कुस्तीचे बाळकडू हे थेट त्याच्या कुटुंबातूनच मिळाले असून, वारसाहक्काने मिळालेल्या या खेळाप्रती त्याची निष्ठा दिसून येत आहे.
त्याच्या या घवघवीत यशामुळे व कौटुंबिक वारशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रेरणेने चालणाऱ्या या शाळेचे मुख्याध्यापक गिरीश गायकवाड, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या वतीने हर्षवर्धनला आगामी जिल्हास्तरीय ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेतही चमकदार कामगिरी करत तो राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारेल आणि वाई तालुक्यासह ओझर्डे गावाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
































