अक्कलकोट बस स्थानकावर भाविकांना लुटणाऱ्या २ भामट्या महिला गजाआड

२.२७ लाखांचे दागिने हस्तगत - घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस 
Two female thieves arrested, police, akkalkot, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, अक्कलकोट (वैभव कुलकर्णी)
अक्कलकोट बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे दाग-दागिने चोरी करणाऱ्या २ सराईत महिला आरोपींना सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सुमारे २ लाख २७ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दोन मणी-मंगळसूत्र (एकूण वजन १५ ग्रॅम ४५० मिली) हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कुंभारी येथून संशयित महिलांना घेतलं ताब्यात
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पंढरपूर व अक्कलकोट बस स्थानक परिसरात गस्त आणि तपास सुरू होता.

दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कुंभारी टोलनाक्याजवळ पेट्रोलिंग करत असताना, बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, अक्कलकोट बस स्थानकावर चोरी करणाऱ्या दोन महिला सध्या कुंभारी बस स्थानकावर थांबल्या आहेत. पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेऊन दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले.

तपासात चोरीची कबुली
ताब्यात घेतलेल्या महिलांकडे सखोल आणि कौशल्याने चौकशी केली असता, त्यांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात अक्कलकोट बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने लांबवल्याची कबुली दिली. पोलिसांनी अभिलेख तपासले असता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अंतर्गत दाखल असलेले दोन गुन्हे (गु.र.नं. ४१८/२०२६ व ४४९/२०२६) उघडकीस आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून, १,५२,००० रुपये किमतीचे १० ग्रॅम ४५० मिलीचे सोन्याचे मंगळसूत्र, ७५,२०० रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, असे एकूण २,२७,२०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
चंद्रकला नितीन कांबळे (वय ३० वर्षे, रा. लक्ष्मी माता मंदिर जवळ, लिंबेवाडी, सोलापूर), नंदा नागनाथ पाथरे (वय ६५ वर्षे, रा. लक्ष्मी माता मंदिर जवळ, लिंबेवाडी, कावळा गल्ली, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत.

कारवाई करणारे पोलीस पथक
ही कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार सलीम बागवान, हरिदास पांढरे, विरेश कलशेट्टी, व्यंकटेश मोरे, जगदीश राठोड, कपिल काटकर, योगेश जाधव, सुनील पवार तसेच महिला पोलीस हवालदार दिपाली जाधव व सुनंदा झळके यांनी पार पाडली.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !