६ गुन्ह्यांची उकल - १.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोलर पॉवर प्लांट तसेच नदीकाठावरील शेतीपंप व पानबुडी मोटारींच्या कॉपर केबल वायर चोरीचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि आरोपींना जेरबंद करण्यासाठी सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत एक मोठी टोळी उघडकीस आणली आहे. पोलीस पथकाने याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून १ लाख ८८ हजार ५०० रुपये किमतीची एकूण १४५ किलो वजनाची कॉपर वायर जप्त केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील कॉपर वायर चोरीच्या तब्बल ६ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून पडला छापा
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना जिल्ह्यातील कॉपर वायर चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक (API) ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथे पथक गस्त घालत असताना, गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. रानमसले येथील समाधान नवनाथ पवार हा आपल्या साथीदारासह गौडगाव (ता. बार्शी), उंदरगाव, वडशिंगे, बेंबळे, रांझणी (ता. माढा) या ठिकाणच्या सोलर प्लांट आणि नदीकाठच्या शेतीपंपांच्या केबल चोरत असल्याचा सुगावा लागला. चोरलेला माल विक्रीसाठी तो घरासमोर थांबल्याची पक्की बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी रानमसले येथे छापा टाकला.
रात्रीच्या वेळी चोरी करून रानात जाळायचे केबल!
संशयित आरोपी समाधान नवनाथ पवार (वय २१ वर्ष, रा. रानमसले, ता. उत्तर सोलापूर) याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याने व त्याच्या एका साथीदाराने मिळून माढा, टेंभूर्णी आणि वैराग परिसरातील सोलर प्लांट तसेच नदीकाठावरील मोटारींच्या केबल रात्रीच्या वेळी चोरल्याची कबुली दिली.
चोरी केलेले केबल वायर ते रानात नेऊन जाळायचे आणि त्यातील तांब्याची तार (कॉपर वायर) वेगळी करून प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरून विक्रीसाठी साठवून ठेवत असत. आरोपीच्या घरातून प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये साठवून ठेवलेली १४५ किलो वजनाची तांब्याची तार हस्तगत करण्यात आली आहे.
उकल झालेले गुन्हेआरोपीने दाखवलेल्या ठिकाणांवरून संबंधित पोलीस ठाण्यांमधील खालील गुन्ह्यांची उकल झाली आहेवैराग पोलीस ठाणे: गु.र.नं. २४८/२०२६ (बीएनएस ३०३(२))माढा पोलीस ठाणे: गु.र.नं. १२५/२०२६ (बीएनएस ३०३(२))माढा पोलीस ठाणे: गु.र.नं. २११/२०२६ (बीएनएस ३०३(२))टेंभूर्णी पोलीस ठाणे: गु.र.नं. ११८/२०२६ (बीएनएस ३०३(२))टेंभूर्णी पोलीस ठाणे: गु.र.नं. १३९/२०२६ (बीएनएस ३०३(२))टेंभूर्णी पोलीस ठाणे: गु.र.नं. २०७/२०२६ (बीएनएस ३०३(२))आरोपी समाधान पवार यास सध्या वैराग पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत सपोनि ज्ञानदेव वाघ, पोउनि ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ नागेश कोणदे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, कोंडीबा मोरे, अक्षय डोंगरे, सतिष बुरकुल, कपिल काटकर आणि महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
































