हरियाणा, राजस्थानपर्यंत तपासाचे धागेदोरे
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
कराड शहरातील फेडरल बँकेजवळील एका मोबाईल शॉपीचे शटर तोडून सुमारे ३० लाख रुपये किमतीचे मोबाईल संच चोरीला गेल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणाचा छडा लावत कराड शहर पोलिसांनी हरियाणातील दोन संशयित आरोपींना वस्कोटी, जि. बेंगळुरू (कर्नाटक) येथून अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरले. आरोपींनी गुन्ह्यासाठी स्क्रॅप गाडीचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी वाहनाचा माग काढत तपासाची दिशा निश्चित केली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिस पथकाने आरोपींचा मागोवा घेतला. चोरीतील मोबाईल संच हरियाणा, राजस्थान तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून अशोक लेलँड ट्रकमधून उत्तर भारतात नेले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणात अब्दुलहाय वसीरअहमद, वय ५१, रा. बावला, ता. तौड, जि. नूह, हरियाणा आणि अलाऊद्दीन जहुरुद्दीन, वय ३१, रा. नेहलहंडा, ता. जेवर, जि. गौतमबुद्धनगर, उत्तर प्रदेश या दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांनी सहभाग घेतला. चोरीच्या मालाचा पुढील तपास सुरू असून या गुन्ह्यामागील इतर साथीदारांचा शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























