महिला महाविद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षण व सुरक्षितता जनजागृती अभियान उत्साहात

विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व, प्रसंगावधान, आत्मविश्वास, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि अडचणीच्या प्रसंग याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन
Self defence workshop for girls, mahila Mahavidyalaya, Karad, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, कराड (शुभम कोदे)
शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालयात मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्याबरोबरच आत्मविश्वास वाढविणे आणि सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मुलींमध्ये स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि सुरक्षितता जनजागृती अभियान’ उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमास शिक्षण मंडळ, कराडचे चेअरमन मा. श्री. बाळासाहेब कुलकर्णी तसेच कौन्सिल सदस्य ॲड. विक्रम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. विपुल पाटील, पाटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुदाम पाचोरकर, भारताच्या पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर मा. सौ. शैला टिके कुलकर्णी, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रय दराडे तसेच पोलीस उपनिरीक्षक मा. सौ. रेखा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अखिलेश शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ यांनी, “मुलींनी शिक्षणासोबतच स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. तसेच स्वतःबरोबरच इतरांच्या सुरक्षेविषयीही संवेदनशील आणि जागरूक राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व, प्रसंगावधान, आत्मविश्वास, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि अडचणीच्या प्रसंगी करावयाच्या कृती याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत घाबरून न जाता धैर्याने, प्रसंगावधान राखून आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रात्यक्षिकांसह देण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली.

यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रय दराडे यांना केंद्रीय गृहखात्यातर्फे विशेष गुणवत्ता पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल शिक्षण मंडळ, कराडचे चेअरमन श्री. बाळासाहेब कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच एस.एम.एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. श्रुती रेमणे यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विलास सुर्वे यांनी मराठी विषयातून, तर डॉ. स्वाती लावंड यांनी प्राणीशास्त्र विषयातून शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्ना केतकर यांनी केले, तर आभार प्रा. रेखा धुळप यांनी मानले.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !