रविवारी होणार महाराष्ट्रातील मानांकित पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा

शुक्रवारी व शनिवारी भव्य एक्स्पोचे आयोजन

Punit Balan marathon, satara hills half marathon, satara, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी आणि संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेली पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा यंदा आपल्या १५ व्या वर्षात पदार्पण करत असून, रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. यावर्षीच्या मॅरेथॉनचे मुख्य प्रायोजकत्व पुनित बालन ग्रुप (PBG) यांच्याकडे असून, सुमारे १० हजार धावपटूंनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भव्य आणि लोकप्रिय मॅरेथॉन एक्स्पोपैकी एक म्हणून यंदाच्या एक्स्पोकडे पाहिले जात आहे.

या स्पर्धेचा भव्य एक्स्पो शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर आणि शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात आयोजित करण्यात आला आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तर दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा एक्स्पो धावपटूंसाठी खुला राहणार आहे.

एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री. छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले (वहिनीसाहेब) यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक  जिवाजी मोहिते हे देखील उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर आणि खजिनदार राहुल घायताडे यांनी संयुक्तरीत्या दिली.

या एक्स्पोमध्ये स्पर्धेसाठी आवश्यक असणारे रेस किट स्पर्धकांना वितरित करण्यात येणार असून, त्यामध्ये टी-शर्ट, रनिंग बिब, संगणकीकृत टायमिंग चिप आदींचा समावेश आहे. रेस किट घेण्यासाठी स्पर्धकांनी नोंदणी केल्याचा पुरावा म्हणून त्यांना प्राप्त झालेला ई-मेल अथवा मोबाईलवर आलेला संदेश दाखवणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाने वयाचा व रहिवासी पत्त्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक असल्याचे आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काटे यांनी केले आहे.

सर्व स्थानिक सातारकर धावपटूंनी आपले रेस किट शक्यतो एक्स्पोच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी ताब्यात घ्यावे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बाहेरगावाहून येणाऱ्या धावपटूंना रेस किट व बिब घेणे अधिक सोयीचे होईल आणि गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळता येईल, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे व जॉईंट रेस डायरेक्टर डॉ. दीपक बनकर यांनी संयोजन समितीच्यावतीने केले आहे.

भव्य जर्मन हँगर पद्धतीने उभारण्यात आलेल्या संपूर्ण वातानुकूलित एक्स्पोमध्ये रेस किट वितरणाबरोबरच धावपटूंसाठी विविध उपयुक्त उपक्रम, स्पोर्ट्स व फिटनेसशी संबंधित साहित्य तसेच विविध आकर्षक स्टॉल्स असणार आहेत.

देशभरातून साताऱ्यात दाखल होणाऱ्या धावपटूंच्या उपस्थितीमुळे एक्स्पोला विशेष रंगत येणार असून, १५ वर्षांची सातारा हिल हाफ मॅरेथॉनची परंपरा आणि सुमारे १० हजार धावपटूंच्या सहभागाचा उत्साह अनुभवण्याची संधी सातारकरांना मिळणार आहे.

धावपटू तसेच नागरिकांची एक्स्पोच्या ठिकाणी ये-जा सुलभ व्हावी यासाठी संयोजन समितीच्यावतीने दोन्ही दिवस विनामूल्य शटल बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा राजवाडा बसस्थानक आणि शाहू स्टेडियम येथून एक्स्पोच्या ठिकाणी दर एक तासाने उपलब्ध असणार आहे. शहरातील नागरिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या धावपटूंना याचा लाभ घेता येणार आहे.

ज्या सातारकर नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही, त्यांनीदेखील या विनामूल्य शटल सेवेचा लाभ घेऊन पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोला आवर्जून भेट द्यावी आणि या क्रीडा महोत्सवाचा उत्साह अनुभवावा, असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने डॉ. आदिती घोरपडे, डॉ. पल्लवी पिसाळ, डॉ. अश्विनी देव, डॉ. रंजिता गोळे, भाग्यश्री ढाणे, डॉ कविता बनकर, केतकी पंडित, श्रुती भंडारी व शिल्पा जाधव यांनी केले आहे.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !