गणेश मंडळांना शिवसेनेतर्फे पूजेच्या साहित्याचे वाटप

मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रम
Pooja kit distribution, minister Bharat gogavle, ganeshotsav, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाई शहरातील गणपती आळी परिसरातील विविध गणेश मंडळांना शिवसेनेतर्फे पूजेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची संकल्पना राबविण्यात आली. ही संकल्पना स्थानिक पातळीवर पोहोचविण्याचे काम त्यांचे विश्वासू सहकारी व पी.ए. मनोज दादा जाधव यांनी केले. 

या उपक्रमाच्या आयोजनासाठी अक्षय भाऊ खाडे आणि प्रणित शेठ फुले यांचे सहकार्य लाभले. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी वाई तालुका युवा सेनेचे अविनाश प्रताप लोखंडे यांनी गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !