अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रशासन सुस्त

युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराम डिक्कर यांचा सरकारला ईशारा!
Hunger strike, Akola, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, ​अकोला (संजय क्षीरसागर) 
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मुख्य मागणीसाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा सातवा दिवस उजाडला तरी अद्याप शासन किंवा प्रशासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीने उपोषणस्थळी भेट न घेतल्याने "शासन माझ्या मृत्यूची वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल अमानकर यांनी उपस्थित केला आहे. 

​प्रशासनाच्या या अत्यंत बेजबाबदार आणि उदासीन कारभाराचा तीव्र निषेध करत युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराम डिक्कर यांनी उपोषण मंडळाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला. प्रशासनाच्या या अमानुष भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढत शिवराम डिक्कर यांनी थेट इशारा दिला आहे की, "जर पुढील २४ तासांत अमानकर यांच्या आणि शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी एकत्र येऊन रस्त्यावर उतरतील."

​शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी होणारे हे आंदोलन प्रशासनाला महागात पडेल, असा इशारा देत डिक्कर यांनी स्पष्ट केले की यानंतर उद्भवणाऱ्या तीव्र जनक्षोभाला आणि कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी शासन व प्रशासनच जबाबदार राहील.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !