हिसोआ इलेक्ट्रॉनिक्स व उर्मी संस्थेकडून शाळेला डिजिटल बोर्ड आणि बेंच भेट

बावधन हायस्कूलमध्ये डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय
Digital board and benches gifted to school, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे बावधन हायस्कूल ता. वाई जि. सातारा येथे हिसोज इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड (विवो पुणे) कंपनीच्या सी एस आर (कापरिट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमांतर्गत उर्मी संस्था तर्फे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित व दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने डिजिटल बोर्ड प्रदान करण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रत्येकी असे चार अत्याधुनिक डिजिटल बोर्ड शालेय अभ्यासक्रम व वीस बेंचेस शाळेला देण्यात आले.

या डिजिटल बोर्डाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांचे शिक्षण अधिक रंजक सोपे व प्रभावी होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या कार्यक्रमात वाई पंचायत समितीचे सदस्य  सचिन भोसले व बावधन ग्रामपंचायतचे उपसरपंच उदयसिंह पिसाळ शाळेचे मुख्याध्यापक  मज्जिद मुकादम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी हिशोआ टीमचे गौम्या बक्षी (एच आर मॅनेजर) श्रीकांत चव्हाण (फायनान्स मॅनेजर) राहुल चुनीदास रोहित बाकाळे (सहाय्यक मॅनेजर फायनान्स व सीएसआर प्रमुख) शेशान पटेल मस्तान एजन्सीज लातूर आसिफ सय्यद (सहाय्यक मॅनेजर सेस्स) नकुल पाटसकर (टीम लीडर उदगीर ) उर्मी संस्थेचे  राहुल शेंडे दिलीप तिडके तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते

या कार्यक्रमादरम्यान  शिवकांत चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले  रोहित वाकाळे सर यांनी उर्मी संस्थेच्या माध्यमातुन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करत भविष्यात संपूर्ण डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला  धनराज बिरादार सर यांनी शाळेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले शालेय समितीचे अध्यक्ष  सचिन भोसले यांनी येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला मुख्याध्यापक  मज्जिद मुकादम सर यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डमुळे अध्यापनाची शैली पूर्णपणे बदलणार असून विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस नक्कीच वाढेल. शाळेच्या भौतिक व शैक्षणिक गरजा ओळखून हिसोआ इलेक्ट्रॉनिक्स आणि उर्मी संस्थेने केलेले हे सहकार्य अतिशय मोलाचे आहे.

दर्जेदार व तंत्रज्ञानादारीत शिक्षण अधिक प्रभावीपणे देण्याची ग्वाही दिली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे त्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणणे व दर्जेदार शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महेंद्र पिसाळ यांनी केले. प्रास्ताविक मुनीर खाटीक यांनी केले आभार ज्योती गुरव यांनी मानले.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !