विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदानाची दखल - शिंदेवाडीचे शिक्षक संतोष धुमाळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

शाळेतील प्रत्येक विद्यार्थी माझा या भावनेला पुरस्काराची पावती 
Best teacher award, Santosh dhumal, malshiras, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
माळशिरस - जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, शिंदेवाडी येथील कर्तव्यदक्ष, विद्यार्थीप्रिय व समर्पित शिक्षक श्री. संतोष सुरेश धुमाळ यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६’ या सन्मानाने गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे शिंदेवाडी परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान आत्मसात न करता आत्मविश्वासाने सक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून घडावे, या उद्देशाने संतोष धुमाळ सर सातत्याने कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा बारकाईने अभ्यास करून त्यांच्या अडचणी व शैक्षणिक उणिवा ओळखणे, त्यानुसार योग्य मार्गदर्शन करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्याला प्रोत्साहन देणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत.
विशेष म्हणजे, आपल्या वर्गापुरते किंवा विषयापुरते मर्यादित न राहता ‘शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा माझा विद्यार्थी आहे’ या भावनेतून ते संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच आत्मविश्वास, जिज्ञासा, संस्कार आणि प्रगतीची जिद्द निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत उल्लेखनीय मानली जाते.

शिक्षकी पेशाप्रती असलेली निष्ठा, विद्यार्थ्यांविषयीची आस्था आणि शैक्षणिक कार्यातील सातत्यपूर्ण योगदान यामुळे संतोष धुमाळ सरांनी शिक्षक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२६’ हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक सेवेला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती ठरला आहे.

या पुरस्काराबद्दल संतोष धुमाळ सरांचे विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक, शाळा व परिसरातील नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत. “शिक्षक घडवतो विद्यार्थी, विद्यार्थी घडवतात उद्याचे भविष्य; आणि अशा भविष्यवेध्या शिक्षकाचा सन्मान म्हणजे संपूर्ण शिक्षणविश्वाचा गौरव!”
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !