हतनूरच्या रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रानभाज्यांच्या संवर्धनातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश : - आमदार संजनाताई जाधव यांची स्टॉल्सना भेट

Wild Vegetable Festival, chatrapati Sambhaji Nagar, Kannad, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी मनोज चव्हाण)

 कृषी विभाग व तंत्रज्ञान विस्तार व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने हतनूर (ता. कन्नड) येथील रुक्मिणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेला तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. महोत्सवाला तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, कृषीप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकारी श्री. संदीप शिरसाठ यांनी प्रास्ताविक करताना रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठीचे महत्त्व विशद केले. बदलत्या आहारपद्धतीमुळे विस्मृतीत जात असलेल्या रानभाज्यांचे जतन आणि त्यांचा दैनंदिन आहारात समावेश करणे ही काळाची गरज असल्याचे q सांगितले.

महोत्सवात महिला बचत गट तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) अंतर्गत कार्यरत गटांनी विविध प्रकारच्या ताज्या, पौष्टिक व औषधी रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते. विविध रानभाज्यांची माहिती, त्यांचे औषधी उपयोग आणि पोषणमूल्ये जाणून घेण्यासाठी नागरिकांनी स्टॉल्सवर मोठी गर्दी केली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. आमदार श्रीमती संजनाताई जाधव (कन्नड–सोयगाव विधानसभा) यांनी स्टॉल्सची पाहणी करून महिला बचत गटांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. संतोष गोरड, तहसीलदार श्रीमती सारिका भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी रानभाज्यांचे संवर्धन, नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि पौष्टिक आहाराबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित केली.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, आत्मा योजनेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM), सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (ATM), तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हतनूर येथील तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

      ---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !