राज्य गुणवत्ता यादीत पाच विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी)च्या अंतिम निकालात पहिल्या वर्षी वाई येथील दिशा स्टडी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. राज्य गुणवत्ता यादीत पाच विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले.
सारंग सागर गायकवाड याने ( ग्रामीण विभागातून) ९४ टक्के (२८२ गुण) मिळवत राज्यात पाचवा, जिल्ह्यात दुसरा व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. युगा प्रविण गायकवाड व तनीष्का धैर्यशील भिलारे-पाटील यांनी प्रत्येकी ९२.६६ टक्के (२७८ गुण) मिळवत राज्यात १३वा क्रमांक मिळविला. विपुल विलास सणस व मेघना धनंजय घोरपडे यांनी प्रत्येकी ९२ टक्के (२७६ गुण) मिळवत राज्यात १५वा क्रमांक पटकाविला.
जिल्हा गुणवत्ता यादीतही दिशा स्टडी सेंटरच्या अखिलेश जमदाडे, असावरी चव्हाण, अक्षरा अडसूळ, स्वराली कावडे, स्वराली मोकाशी, सृष्टी पांढरे, ऋषभ जाधव, संस्कार जगताप(ग्रामीण विभाग) शमिका मोरे, आदित्य मोरे, समृद्धी माळी, अंजली सपकाळ, अर्पित नवले, आर्यन गायकवाड(ग्रामीण विभाग), सौम्या चव्हाण, आराध्य शिंदे, अक्षदा क्षीरसागर, हर्ष काळे, वेदराज अनपट या 19 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. तसेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी)मध्ये अनुराग योगेश शिंदे याने 236 गुण मिळवून जिल्ह्यात 142 वा क्रमांक मिळविला.
दिशा अकॅडमीचे अनेक विद्यार्थी सातत्याने विविध स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण निकालामुळे दिशा अकॅडमी ही पालकांची विश्वासाची व पहिली पसंतीची संस्था बनली आहे.
या दैदिप्यमान यशामागे दिशा स्टडी सेंटरच्या अनुभवी व समर्पित शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे.
मराठी विषयासाठी सौ.अर्चना ढगे-जाधव,सौ.जयश्री फरांदे व गणित व बुद्धिमत्ता विषयासाठी
निरंजन पवार सर, कु.नजहत मुजावर मिस, कु.अंकिता कुंभार मिस. सौ शुभांगी बोंबले मिस, प्रवीण जगताप सर ,व इंग्रजी विषयासाठी सौ.रेश्मा भगत मिस, यांनी विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध व गुणवत्ता पूर्ण मार्गदर्शन केले. संपूर्ण शैक्षणिक नियोजनाची धुरा अकॅडमीक हेड सौ.प्रियंका येवले- कोचळे, यांनी समर्थपणे सांभाळली.
दिशा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नितीन कदम व सचिव प्रा. रुपाली कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रा. रुपाली कदम म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण सरावाची जोड मिळाल्यास यश निश्चित मिळते. शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचे हे यश दिशा अकॅडमीच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक बळ देणारे असून, आगामी काळातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न सुरू राहतील.”
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























