प्राणी मित्रांनी सुरक्षीत पकडून वनविभागाच्या केले स्वाधीन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरतील रविवार पेठ, पटेल वाडा परिसरात फजल पटेल यांच्या घराजवळ सोमवारी रात्री १० च्या सुमारास अतिशय दुर्मिळ प्रजातीचे खवल्या मांजर आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. नागरिकांनी तातडीने सर्पमित्रांना माहिती दिल्यानंतर सर्पमित्रांच्या प्रयत्नांनी या वन्यजीवाला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले.
सर्पमित्र अंकुश पवार, शाहरुख पटेल, अजीज शेख, सौरभ कासार आणि तोसिफ मुजावर यांनी काळजीपूर्वक खवल्या मांजराला ताब्यात घेतले. यावेळी परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घटनेची माहिती वनविभागाचे RFO एस. सी. रेड्डी पाटील व संग्राम मोरे यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खवल्या मांजराला वनविभागाच्या ताब्यात घेतले असून, त्याची आवश्यक तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.
खवल्या मांजर हा वन्यजीव असून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या घटनेत स्थानिक नागरिक, सर्पमित्र तसेच प्राणीप्रेमींनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वन्यजीवाला सुरक्षितपणे वाचवता आले.
वनविभागाचे आवाहन: "असा कोणताही दुर्मिळ वन्यजीव मानवी वस्तीत किंवा संकटात सापडलेला आढळल्यास त्याला इजा न पोहोचवता त्वरित वनविभाग किंवा स्थानिक प्राणीमित्रांशी संपर्क साधावा."
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























