एमपीएससी परीक्षेतून 'वर्ग-१' अधिकारी म्हणून निवड; ३० आठवड्यांच्या कालावधीसाठी सांभाळणार धुरा
शिवशाही वृत्तसेवा,सोलापूर (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी या महत्त्वपूर्ण पदावर विशाल पांडुरंग मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १७ ऑगस्ट २०२६ ते १३ मार्च २०२७ या ३० आठवड्यांच्या कालावधीसाठी ते या पदाची प्रशासकीय जबाबदारी पार पाडणार आहेत.
एमपीएससी परीक्षेतून उच्च पदावर निवड
नूतन शिक्षणाधिकारी विशाल मुळे हे मूळचे बीड जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या 'राज्यसेवा परीक्षा २०२१' मध्ये (ज्याचा निकाल २०२२ मध्ये घोषित झाला) घवघवीत यश मिळवून 'शिक्षणाधिकारी (वर्ग-१)' या उच्च पदावर निवड संपादन केली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे शिक्षण क्षेत्रासह सर्वस्तरांतून स्वागत केले जात असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण टप्पा
शालेय शिक्षण विभागाच्या सुधारित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार राज्यभरातील १३ परिविक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी क्षेत्रीय प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विशाल मुळे हे सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळत प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेणार आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























