वाई पोलिसांची धडक कारवाई- बेपत्ता तीन अल्पवयीन मुलांचा २४ तासांत शोध - पालकांच्या स्वाधीन

सीसीटीव्ही फुटेज अन् डोंगरदऱ्यांतील शोधमोहीम फळाला; पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक

Police's swift and decisive action, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलांचा अवघ्या २४ तासांच्या आत शोध घेण्यात वाई पोलिसांना यश आले आहे. शोध लागल्यानंतर या तीनही मुलांना सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांच्या या धाडसी आणि कार्यतत्पर कामगिरीचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी वाई पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी तातडीने सातारा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांची परवानगी घेतली. गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत चर्चा करून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे व पोलीस कर्मचाऱ्यांची तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

कशी राबवली शोधमोहीम

 पहिले पथक: वाई परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.

 दुसरे पथक: मांढरदेवी बाजूकडे तपासासाठी गेले.

 तिसरे पथक:पाचगणीच्या दिशेने मुलांचा शोध घेऊ लागले.

तपासादरम्यान पहिल्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल धोत्रे यांना वाई एमआयडीसी चांदणी चौक येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीनही अपहृत मुले रस्त्याने फिरताना दिसून आली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि उपनिरीक्षक अमित सुर्वे यांनी सर्व पथकांना बोपर्डी परिसरात एकत्र येण्याचे आदेश दिले.

त्यानंतर पोलिसांनी धावडी, बोपर्डी, लोहारे, सुलतानपूर आणि शेलारवाडी येथे जाऊन नागरिकांना मुलांचे फोटो दाखवून शोध तीव्र केला.

डोंगराच्या पलीकडे रचला सापळा:

शोध सुरू असतानाच आयटीआय कॉलेज परिसरातील डोंगराच्या बाजूला मुले पळताना दिसली. पोलीस पथकाने तात्काळ डोंगर परिसरात सापळा रचून पाठलाग सुरू केला. अखेर डोंगराच्या पलीकडील बाजूस असलेल्या रेणसे वस्ती येथे ही तीनही मुले सुखरूप आढळून आली.

चौकशी केली असता, ही तीनही मुले मित्र असून सायकल चालवत फिरत फिरत पुढे निघून गेल्याचे समोर आले. पोलिसांनी या मुलांचे योग्य समुपदेशन करून त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

या पथकाने बजावली कामगिरी:

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यात वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, विशाल येवले आणि होमगार्ड इंद्रजित लाखे यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली.

गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ तासांच्या आत मुलांचा शोध घेणाऱ्या वाई पोलिसांच्या या तत्परतेमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा अधिक उज्ज्वल झाली आहे.

       -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !