शेळगाव गौरी गावातील पाच विद्यार्थी पीएच.डी.धारक, शिक्षण क्षेत्रात रचला इतिहास

विकासासोबतच शिक्षण क्षेत्रातही निर्माण केली गावाची नवी ओळख

New identity of a village, PhD folders village, Naigaon, Nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कूंटूंरकर) 

नायगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या शेळगाव गौरी गावाने विकासासोबतच शिक्षण क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावातील तब्बल पाच जणांनी विविध विषयांत पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याने गावाच्या शैक्षणिक प्रगतीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

गावातील डॉ. कोमल साहेबराव पाटील यांनी मार्गदर्शक डॉ. सतीश पावलारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली “Extraction, Isolation and Pharmacological Antidiabetic Activity of Momordica charantia Linn. Plant” या विषयावर संशोधन पूर्ण करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. (Momordica charantia Linn.) या वनस्पतीचे निष्कर्षण, विलगीकरण आणि औषधीय मधुमेहविरोधी क्रियाशीलतेचा त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेळगाव गौरी गावातून पीएच.डी. मिळविणाऱ्यांमध्ये यापूर्वी सरपंच डॉ. मनोहर तोटरे यांनी लोकप्रशासन विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यानंतर डॉ. शिवाजी देवराव शेळगावकर यांनी अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, डॉ. आशा तानाजी शेळगावकर यांनी अर्थशास्त्र, तर डॉ. सद्दाम रब्बानी सय्यद कॉमर्स  . विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. आता डॉ. कोमल साहेबराव पाटील यांच्या यशामुळे गावातील पीएच.डी.धारकांची संख्या पाच झाली आहे.

डॉ. कोमल पाटील यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, मेहनत आणि संशोधनाची चिकाटी महत्त्वाची ठरली. तसेच त्यांचे पती मा.श्री दीपक श्रीराम शिंदे पाटील गडगेकर, सासरे,श्रीराम पाटील गडगेकर आणि वडील आदर्श गावातील आदर्श व्यक्तिमत्व असलेले. मा.साहेबराव पाटील शेळगावकर यांनी दिलेला प्रोत्साहन व पाठिंबा मोलाचा ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

२0 ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या व्हायवा परीक्षेनंतर त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. या उल्लेखनीय यशाबद्दल गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. कोमल पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे. आपल्या यशाबद्दल त्यांनी सर्व शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !