खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या सल्लागार समितीवर नियुक्ती - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

महिला व बालविकास मंत्रालयातील महत्त्वाची जबाबदारी

Member of the Advisory Committee, Ministry of Women and Child Development, MP Jyoti Waghmare, DCM Eknath Shinde, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण सल्लागार समितीवर (Consultative Committee) सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतरच्या पहिल्याच संसदीय अधिवेशनानंतर डॉ. वाघमारे यांच्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी त्यांच्या संसदीय आणि राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. महिला आणि बालकांशी संबंधित विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा, आढावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी या समितीची भूमिका महत्त्वाची असते.

या नियुक्तीचे अधिकृत पत्र शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. वाघमारे यांचे अभिनंदन करत महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

पहिल्याच अधिवेशनातील अभ्यासू कामगिरीची दखल

राज्यसभेवर निवड झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात डॉ. ज्योती वाघमारे यांनी विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण मांडणी आणि संसदीय सहभागातून आपली छाप पाडली. त्यांच्या या कामाची दखल घेत केंद्र सरकारने महिला व बालविकास मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती केली असल्याचे मानले जात आहे.

महिलांचे आरोग्य, सुरक्षा, शिक्षण व सक्षमीकरण तसेच बालकांचे पोषण, आरोग्य, संरक्षण आणि सर्वांगीण विकास यांसारख्या विषयांवर राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक चर्चा करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे डॉ. वाघमारे यांना मिळालेली जबाबदारी त्यांच्या संसदीय कार्याला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ठरणार आहे.

राजकीय व सामाजिक स्तरातून अभिनंदन

केंद्र सरकारच्या या नियुक्तीबद्दल डॉ. ज्योती वाघमारे यांचे राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर प्रभावी आवाज मिळवून देण्याची संधी त्यांना मिळाली असून, या संधीचा उपयोग त्या प्रभावीपणे करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !