राष्ट्रीय छात्र सेना गट मुख्यालय परिषद उत्साहात संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, छत्रपती संभाजीनगर (मनोज चव्हाण)
राष्ट्रीय छात्र सेना (NCC) ५० महाराष्ट्र बटालियनच्या वतीने महाविद्यालयीन व शालेय असोसिएट NCC अधिकारी (ANO) यांची एकदिवसीय परिषद १८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत वर्षभरातील NCC उपक्रमांचा आढावा, विविध शिबिरांचे नियोजन, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, A, B व C प्रमाणपत्र परीक्षांची तयारी तसेच आगामी शैक्षणिक वर्षाचे नियोजन यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेच्या प्रारंभी ५० महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. पी. एस. ठाकूर यांना NCC कॅडेट्सकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी ऑडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल कीर्ती मुंडले यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यातील विविध महाविद्यालये व शाळांमधील NCC अधिकारी मोठ्या संख्येने परिषदेस उपस्थित होते.
कॅप्टन डॉ. गजानन सानप यांचा विशेष गौरव
परिषदेतील विशेष आकर्षण ठरलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे ANO कॅप्टन डॉ. गजानन सानप यांना ‘बेस्ट एएनओ (SD/SW)’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
मराठवाड्यात NCC हा ऐच्छिक विषय म्हणून प्रभावीपणे विस्तारण्यास व त्याची अंमलबजावणी करण्यास डॉ. सानप यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील NCC संदर्भातील पायाभूत सुविधा विकसित करण्यामध्ये त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि सातत्यपूर्ण उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कर्नल बी. पी. एस. ठाकूर यांनी संपूर्ण वर्षभर आयोजित करण्यात येणारी विविध NCC शिबिरे, दैनंदिन उपक्रम व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, NCC अभ्यासक्रम तसेच A, B व C प्रमाणपत्र परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी आणि विद्यापीठ स्तरावरील NCC अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित ANO अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ANO व कॅडेट्सचा गौरव
परिषदेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या इतर ANO अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. होली क्रॉस मराठी स्कूल, छत्रपती संभाजीनगर येथील S/O अशोक पाटील यांना शालेय स्तरावरील ‘बेस्ट एएनओ (JD/JW)’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच MIT कॉलेजचे कॅप्टन शोण पाटील यांना महाराष्ट्र EBSB-I कॅम्प २०२६ मधील उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
PRCN/Refresher Course यशस्वीरीत्या पूर्ण करून पदोन्नती मिळविलेल्या ANO अधिकाऱ्यांचा यावेळी ‘पिपिंग सेरेमनी’द्वारे सन्मान करण्यात आला. यामध्ये कॅप्टन डॉ. गजानन सानप (एस. बी. कॉलेज ऑफ सायन्स), कॅप्टन बाळाजी जोकरे (व्ही. एन. कॉलेज), S/O सुनील सांगळे (ज्ञानेश विद्या मंदिर), S/O वारकड किरण (PM श्री KV Shift-II) आणि लेफ्टनंट विजय माटकर (शिवाजी कॉलेज, कन्नड) यांचा समावेश होता.
५० महाराष्ट्र बटालियन NCC मधील MIT कॉलेजचे कॅडेट अभिजित कुंदे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दलही विशेष सन्मान करण्यात आला. EBSB-I कॅम्पमध्ये त्यांनी ‘कॅम्प सीनियर’ म्हणून प्रभावीपणे जबाबदारी पार पाडली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ANO, अधिकारी व NCC कर्मचाऱ्यांचा गौरव करून परिषदेची सांगता करण्यात आली.
सर्व स्तरातून अभिनंदन
कॅप्टन डॉ. गजानन सानप यांना मिळालेल्या ‘बेस्ट एएनओ’ पुरस्काराबद्दल ब्रिगेडियर ए. बरबरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिनेश वकील, सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, प्राचार्य डॉ. सतीश पाटील, प्राचार्य विवेक मिरगणे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच NCC परिवारातील अधिकारी, कॅडेट्स व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कॅप्टन डॉ. गजानन सानप यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची, नेतृत्वगुणांची आणि NCC विस्तारासाठीच्या योगदानाची पावती मानली जात आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























