स्वेरीतून मिळणाऱ्या संस्कारांमुळे विद्यार्थी घडत आहेत - साहित्यिक प्रा. प्रकाश राऊत

स्वेरीचा २८ वा वर्धापनदिन थाटात संपन्न

28 th anniversary of fairy college, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)

‘स्वतःच्या आयुष्याचे रणांगण करून घेणारे डॉ. रोंगे सर यांनी विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल करण्याचा वसा घेतला आहे. त्यामुळे, त्यांच्या कार्याला आपण फक्त साथ द्यायची भूमिका घ्यायची आहे. आपले बलस्थान ओळखून आपल्याला बाहेरचे विश्व आत्ताच खुणावत आहे. विद्यार्थ्यांना डॉ. रोंगे सरांप्रमाणे सातत्याने परिश्रम करावे लागणार आहेत. त्यामुळे सहनशीलता व नेतृत्व करण्याचे गुण अंगी येतील. स्वेरीतून मिळणाऱ्या संस्कारांमुळे विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने घडत आहेत. आता या शिक्षणतज्ञांना  शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी विधानपरिषदेमध्ये पाठविण्याची गरज आहे, तसा सर्वत्र अभूतपूर्व प्रतिसाद देखील मिळत आहे.’ असे प्रतिपादन चिपरी (जि.कोल्हापूर) मधील जीवा पाटील हायस्कूलचे कलाशिक्षक व साहित्यिक प्रा. प्रकाश राऊत यांनी केले. 

स्वेरीच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. प्रकाश राऊत हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले हे होते. स्वेरीचे मार्गदर्शक कर्मयोगी श्रद्धेय कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थित पाहुण्यांनी आदरांजली वाहिली. दीपप्रज्वलनानंतर स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये ‘१९९८ पासून ते आत्तापर्यंतच्या २८ वर्षांच्या स्वेरीच्या यशस्वी वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे, पावलोपावली झालेल्या संघर्षातून गोपाळपूरच्या माळरानावर हा इतिहास घडला, हे सांगून जीवनात जर यश मिळवायचे असेल तर कसल्याही परिस्थितीचा बाऊ करू नये हा मेसेज दिला. यासाठी कधी कधी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन कार्य केल्यास इतिहास घडतो. त्याचबरोबर कालानुरूप होणारे बदल हे स्वीकारून यशाकडे वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. ‘टफ टाईम्स नेव्हर लास्ट बट टफ पीपल डू’ या पुस्तकाने माझ्या जीवनाला कलाटणी दिली आणि तेंव्हापासून मी नियमित वाचन करू लागलो. वाचनामुळे मन प्रसन्न राहते आणि मानसिक दृष्ट्या खंबीर राहिल्यास निर्णय अचूक ठरतात असे सांगून अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की ‘अभियांत्रिकीची प्रत्येक ब्रांच चांगली आहे, फक्त त्याला आपण योग्य न्याय दिला पाहिजे, असे सांगून त्यांनी अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले. करमाळ्याच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सर्वेसर्वा प्रा. विलास घुमरे म्हणाले की, डॉ.रोंगे सर म्हणजे सहनशीलता, अभ्यासू निरीक्षण, परीक्षण करणारे अष्टपैलू नेतृत्व असून यांचे नाव राज्यात तर आहेच पण आता त्यांची विधानसभेत शिक्षक आमदार म्हणून नवी ओळख व्हावी, अशी इच्छा आहे. सरांच्या अभ्यासाचा फायदा राज्यातील शिक्षकांना व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून शासन दरबारी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. रोंगे सरांना निवडून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. वटवटे येथील जकराया शुगर फॅक्टरीचे चेअरमन ऍड. बिरप्पा जाधव म्हणाले की, ‘मी शेतकऱ्यांसाठी वकिली केली असून त्यांच्या वेदना जवळून पाहिलेल्या आहेत. त्यासाठी मी काम पाहत आहे तसेच अभियांत्रिकीचे सर्व साईड सर्वोत्तम आहेत. एक ब्रांच मिळाली नाही तर नाराज न होता दुसरी बॅच घ्या, त्यात करिअर करा. स्वेरीच्या प्लेसमेंटचा डंका राज्यात घुमतोय. माझ्या एल.एल.बी. चा उपयोग प्रशासकीय कामामध्ये होत असताना आता कोणतीही अडचण येत नाही, त्यामुळे मुळाशी जावे लागते. सतत पॉझिटिव्ह विचार ठेवल्यास यशस्वी होता येते.’ स्वेरीच्या वाटचालीचे साक्षीदार असलेले सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विश्वासराव मोरे यांनी देखील मनोगतात डॉ.रोंगे सरांच्या व सहकाऱ्यांच्या परिश्रमाचे बहारदार शैलीत कौतुक केले. वर्धापन दिन कार्यक्रमानंतर घेतलेल्या ‘सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुण, मिमिक्री तसेच जुन्या हिंदी गीतांचा सुरेख संगम ऐकविला. एकसूत्रपणाने केलेले नृत्य आणि लक्षवेधी प्रकाश योजना यामुळे सर्व उपस्थित थक्क झाले. वर्धापन दिनामध्ये स्वेरी परिवारातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा देखील सन्मान करण्यात आला. स्वेरीच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य इमारत व नूतन इमारतीची विविध रंगांच्या लाईट माळांच्या रोषणाईने आकर्षकता वाढवली होती. यावेळी प्राचार्य डॉ.फंड, करकंबचे आदर्श शिक्षक पत्रकार भीमराव व्यवहारे, विठ्ठलराव शिंदे प्रशालेचे संभाजी थिटे, गोपाळपूरचे सरपंच पांडुरंग देवमारे, माजी उपसरपंच विक्रम आसबे, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भोसले, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन व स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, उपाध्यक्ष एस.टी.राऊत, श्रीमती वंदना रोंगे, विश्वस्त एच. एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.सतीश मांडवे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पाचही महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.नीता तळवलकर, सोनाली कांबळे व ज्ञानेश्वरी मेटकरी यांनी सूत्रसंचालन केले तर सर्वांच्या मिष्टांन्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता केली.

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या हिताचा विचार करता स्वेरी कॅम्पसची भाषा इंग्रजी आहे. करिअरच्या दृष्टीने इंग्रजी संभाषण केले तर जागतिक बाजारपेठेमध्ये यासाठी विद्यार्थ्यांचे महत्त्व वाढते म्हणून कॅम्पस मधील संभाषणाची भाषा इंग्रजी आहे. त्यामुळे कॅम्पस मध्ये सर्वजण इंग्रजी मध्ये संभाषण करतात हे सर्वश्रुत आहे. असे असताना वर्धापन दिनी आलेले पाहुणे, पालक त्यांना व्यवस्थित समजण्यासाठी मराठी भाषेची गरज आहे हे ओळखून प्राचार्य डॉ. रोंगे सरांनी मराठीत बोलण्याची परवानगी विद्यार्थ्यांकडून घेतल्याचे पाहून आलेले पाहुणे व पालक थक्क झाले.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !