सातारा बसस्थानकात प्रवाशांची लूट - काखेला कळसा, गावाला वळसा कारभारावर प्रवास्यांचा संताप

दोन वर्षांपासून चुकीच्या मार्गामुळे ७-८ रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड - मुलभूत सुविधांचा मात्र पुरता बोजवारा

Inconvenience at the bus stand, msrtc change extra, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे) 

जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेले सातारा बसस्थानक सध्या अनागोंदी कारभार आणि गैरसोयींचे माहेरघर बनले आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे गेली दोन वर्षे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

वळसा मार्गाचा आर्थिक फटका

मेढा, वाई आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या एसटी बसेसना स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पवईनाका व पोस्ट ऑफिसमार्गे मोठा वळसा घालून जावे लागत आहे. या 'गावाला वळसा' घालणाऱ्या मार्गामुळे सातारा ते मेढा प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाकडून तब्बल ७ ते ८ रुपये अतिरिक्त भाडे उकळले जात आहे. प्रशासनाच्या या अघोषित नियमामुळे गेल्या दोन वर्षांत लाखो रुपयांचा अतिरिक्त भार प्रवाशांच्या खिशावर पडला आहे.

स्थानकात गैरसोयींचा डोंगर

अस्वच्छतेचे साम्राज्य: स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून प्रचंड दुर्गंधी आणि पाण्याचा अभाव यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोफत स्वच्छतागृहाचे आश्वासन कागदावरच राहिले असून अप्रत्यक्षपणे पैसे उकळले जात आहेत.

ज्येष्ठांची दमछाक: ग्रामीण भागातील बसेस नियोजित फलाटांवर न लावता कोपऱ्यात उभ्या केल्या जात असल्याने वयोवृद्ध व महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

इंधन बचतीचा संदेश देणाऱ्या प्रशासनाने तातडीने हा रस्ता एसटी बसेससाठी मोकळा करावा आणि अनावश्यक भाडेवाढ रद्द करून स्थानकात स्वच्छता राखावी, अशी जोरदार मागणी समाजसेवक गोपाळ जाधव यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जात आहे.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !