वाई भाजी मंडईच्या आधुनिकीकरणाला अखेर हिरवा कंदील

३०० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांना आधुनिक सुविधा, वाहतूक कोंडीही होणार कमी

Modernization of the vegetable market, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

 वाई शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले भाजी मंडईच्या बहुप्रतिक्षित आधुनिकीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, तब्बल ५८ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. अनेक वर्षांपासून व्यापारी, ग्राहक आणि नागरिक ज्या सुविधांची अपेक्षा करत होते, त्या आता प्रत्यक्षात साकार होणार असल्याने शहरात समाधानाचे वातावरण आहे.

     या विकासकामासाठी रस्ते अनुदान योजनेतून ५८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून भाजी मंडईचे संपूर्ण नूतनीकरण, वाढीव भागाचे सिमेंट काँक्रीटीकरण, भाजी विक्रेत्यांसाठी शेड उभारणे, गाळ्यांची उभारणी, कट्टे, लोखंडी जाळ्या, पांढरे पट्टे तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

     या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे, विधान परिषद आ. धैर्यशील कदम यांच्या सहकार्याने तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून व वाई नगरपरिषदेतील सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने हा प्रकल्प मार्गी लागला आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी आणि वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     सध्या महात्मा फुले भाजी मंडईमध्ये सुमारे १०० ते १५० व्यापारी व्यवसाय करत आहेत. जागेच्या कमतरतेमुळे अनेक व्यापाऱ्यांना रस्त्यावर किंवा अपुऱ्या सुविधांमध्ये व्यवसाय करावा लागत आहे. मात्र, नवीन नियोजनानुसार ३०० ते ३२५ व्यापाऱ्यांना नियोजनबद्ध आणि हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांची गैरसोय दूर होण्याबरोबरच ग्राहकांनाही स्वच्छ, सुरक्षित आणि सुटसुटीत बाजारपेठ उपलब्ध होईल.

     वाई शहरात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने मंडई परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले होते. या पार्श्वभूमीवर मंडई परिसरातील रस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी रस्ते खुल्या झाल्यानंतर रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने तसेच आपत्कालीन सेवांची वाहतूक सुरळीत होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्राहकांना बाजारात ये-जा करताना होणारा त्रासही कमी होईल.

     मंडई परिसरातील अस्वच्छता, कचरा आणि दुर्गंधी यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. नवीन प्रकल्पात स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात आले असून भाजीपाला स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात विक्रीसाठी उपलब्ध राहील, याची काळजी घेतली जाणार आहे. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ परिसरासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.

     मंडईचे नूतनीकरण सुरू असताना व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद पडू नये, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. जुनी मंडई पूर्णपणे बंद न करता आवश्यकतेनुसार तात्पुरते स्थलांतर करून व्यवसाय सुरू ठेवला जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टळणार आहे.

     नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी व्यापाऱ्यांना विकासकामात सहकार्य करण्याचे आवाहन केले. "अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे. कोणत्याही समस्या अथवा शंका असल्यास त्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात. चुकीची माहिती किंवा अफवा सोशल मीडियावर पसरवू नयेत. विकासकामात सर्वांनी सहभागी व्हावे," असे त्यांनी सांगितले.

     भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चेवर प्रतिक्रिया देताना भाजप शहराध्यक्षांनी स्पष्ट केले की, नगरपालिकेची निवडणूक सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली असली तरी निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका कायम राहणार आहे. कोणत्याही मित्रपक्षाला जाणीवपूर्वक डावलण्यात आलेले नसून शहराचा विकास हेच सर्वांचे समान उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     यावेळी गोविंद इथापे यांनी वाई शहराला आधुनिक आणि नियोजनबद्ध 'ड्रीम सिटी' बनविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. नागरिक आणि व्यापाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

     संतोष जमदाडे यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले भाजी मंडई नूतनीकरणाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचा आनंद व्यक्त केला. नगरपरिषदेचे बांधकाम विभाग, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांचे त्यांनी आभार मानले.

आरोग्य सभापती केतकी पाटणे-मोरे यांनीही नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली.

 याशिवाय शहर विकासाच्या व्यापक आराखड्यात भुयारी गटार योजना, नदी संवर्धन, हद्दवाढ आणि वाहतूक सुधारणा यांसारखे महत्त्वाचे प्रकल्पही प्रक्रियेत असून, येत्या काळात वाई शहराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

        -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !