समाज एकता आणि शैक्षणिक प्रगतीचा संकल्प
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
स्वकुळ साळी समाज, वाई यांच्या वतीने आयोजित 'भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव २०२६' अत्यंत मंगलमय, धार्मिक आणि सामाजिक उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी समाजबांधवांचा सत्कार करून समाज एकता आणि शैक्षणिक प्रगतीचा संकल्प सोडण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विवेक ठोके (अध्यक्ष, सांस्कृतिक क्रीडा मंडळ, सातारा जिल्हा), महेश पागडे (अध्यक्ष, स्वकुळ साळी समाज संघटना, सातारा जिल्हा), सुरेश पंढरपट्टे (कार्याध्यक्ष), उमेश घटे (सचिव), योगेश कुचेकर (संचालक), श्रीकांत डिंगणकर (संचालक) व बाबुराव डांगरे (संचालक) उपस्थित होते.
विविध जबाबदाऱ्या स्वीकारून सामाजिक योगदान देणाऱ्या नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये दत्तात्रय महमर्ढेकर, योगेश दाहोरे, आनंदा सुकाळे, मयूर कोदे, शैलेश धेडे, सारिका गवते, सोनाली दाहोरे, सोनाली कोदे, वनिता हावरे, इर्षा तांबे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आणि टीईटी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या समाजबांधवांचा यावेळी गौरव करण्यात आला. "हा सत्कार केवळ कौतुक नसून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा उपक्रम आहे," असा सूर यावेळी व्यक्त झाला.
आरतीने सोहळ्याची सांगता
प्रास्ताविक व स्वागतानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, वार्षिक अहवाल वाचन आणि अध्यक्षीय भाषण झाले. यानंतर आभार प्रदर्शन आणि भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या भक्तिमय आरतीने सोहळ्याची सांगता झाली. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत दिमाखदार ठरला.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























