लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

रक्षाबंधनापूर्वी खात्यात जमा होणार ३,००० रुपये

Good news for beloved sisters, Mumbai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,मुंबई प्रतिनिधी 

जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून ३,००० रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

​राज्य सरकारकडून महिला व बालविकास विभागाला ३१९.५३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

​यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला असून शासन निर्णय जारी झाला आहे.

​कधी मिळणार पैसे: रक्षाबंधनापूर्वी (२० ऑगस्टपूर्वी) पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचे नियोजन आहे.

​सविस्तर वृत्त

​मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याचा हफ्ता अद्याप मिळाला नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र आता जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिने मिळून ३,००० रुपये एकत्र दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

​या योजनेच्या अंमलबजावणीसाठी वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला असून, सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे ३१९.५३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

​पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात दरमहा १० ते १५ तारखेच्या आत पैसे जमा करण्याचे प्रशासनाचे नियोजन असते. मात्र यावेळी रक्षाबंधन पूर्वी जमा करण्याचे उद्दिष्ट आहे.

​ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झालेल्या पडताळणी मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या, बँक खाते आधारशी लिंक नसलेल्या आणि ई-केवायसी (e-KYC) न केलेल्या सुमारे ८० लाख महिलांचे अर्ज तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांचा लाभ सध्या बंद करण्यात आला आहे.

​आता निधी वर्ग झाल्यामुळे येत्या काही दिवसांत, विशेषतः रक्षाबंधनापूर्वी, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हफ्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल.

       -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !