यश-अपयशाच्या विचारात अडकू नका संघर्ष करा - अनुभवच दिशा देईल - IPS बिरदेव ढोणे यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा कानमंत्र

पांचवड येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Competitive exam guidance lecture, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

जिद्द, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करून “यश मिळेल की अपयश, याचा विचार करत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी संघर्षाची वाट धरावी. संघर्षातून मिळणारा अनुभव आयुष्यभर दिशा देतो आणि जगण्याचे खरे शिक्षण देतो,” असा प्रेरणादायी संदेश IPS बिरदेव ढोणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.  या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पाचवड ता. वाई येथे आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिका व तिरंगा एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे, भुईंज पोलीस स्टेशनचे  सपोनि. पृथ्वीराज ताटे, प्राचार्य आर. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या काळात पालकांकडून शालेय जीवनापासूनच मुलांवर आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी निर्णय लादले जातात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्या. त्यांना यशाबरोबरच अपयशाचा अनुभवही घेऊ द्या. कारण अनुभवातूनच व्यक्तिमत्त्व घडते आणि शिक्षण व संस्कारांची खरी जाणीव होते, असे प्रतिपादन बिरदेव ढोणे यांनी केले.

यावेळी त्यांनी स्वतःच्या जीवनातील संघर्षमय प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ध्येय गाठताना आलेले अनेक प्रसंग, अडचणी आणि अनुभवांचे दाखले देत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, मेहनत, संयम आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यसेवा परीक्षेत यश मिळविलेले आरोग्य अधिकारी रुपेश मोरे, फॉरेन्सिक अधिकारी अभिनया गायकवाड व श्रेयश इथापे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संस्थेचे मार्गदर्शक-सचिव जयवंत पवार यांनी स्वागत केले. प्राचार्या वनिता पवार यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पत्रकार जयवंत पिसाळ व विजया पवार यांनी केले.

कार्यक्रमास स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, द्रोणाचार्य करिअर अकॅडमीचे विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आईच्या शिकवण संस्कारांनी ढोणे भावुक; उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू

आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील अनुभव सांगताना आईच्या शिकवणीचा प्रसंग सांगताच IPS बिरदेव ढोणे भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. “महामार्गावरून ये-जा करताना या परिसरात पुन्हा येत राहीन,” असे त्यांनी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.

     -----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !