कॅनरा विद्या ज्योती शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात

मुलगी शिकली, सक्षम झाली आणि स्वावलंबी झाली, तरच देशाची प्रगती अधिक भक्कम होईल,’ हा संदेश देण्यात आला.

Canara Vidya Jyothi Scholarship Distribution Program, Chhatrapati Sambhaji Nagar, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,छ.संभाजीनगर (प्रतिनिधी मनोज चव्हाण)

छत्रपती संभाजीनगर : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कॅनरा बँक, प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ‘कॅनरा विद्या ज्योती शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गुणवंत व होतकरू विद्यार्थिनींच्या शैक्षणिक वाटचालीला आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगरचे सहायक संचालक (वित्त) श्री. शरद भिंगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅनरा बँक प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक प्रमुख श्री. केशवमूर्ती बी. व्ही. होते.

यावेळी विविध शाळा-महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. शरद भिंगारे यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि जीवनात मोठी ध्येये ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाच्या माध्यमातून मुलींनी आत्मनिर्भर होऊन समाज व राष्ट्राच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कॅनरा बँकेच्या या स्तुत्य CSR उपक्रमाचे विविध शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व पालकांनी कौतुक केले. आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

‘मुलगी शिकली, सक्षम झाली आणि स्वावलंबी झाली, तरच देशाची प्रगती अधिक भक्कम होईल,’ हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाला.

कॅनरा बँकेच्या कॅनरा विद्या ज्योती उपक्रमातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे आणि शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॅनरा बँकेच्या FI विभागासह सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पालक व विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले.

      -----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !