भुईंज पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याला यश, एकूण ३ आरोपी गजाआड
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
अमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी भुईंज पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी हाती घेतलेल्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले असून, गांजा विक्री प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन आरोपींकडून तब्बल १ लाख २१ हजार ३३० रुपये किमतीचा ५ किलो ७३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
भुईंज पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याखाली सुरू असलेल्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फलटण येथील सोमवार पेठ भागात छापा टाकला. या छाप्यात आरोपी अमरदीप संजय गायकवाड (वय ३८) आणि संजय रायबा गायकवाड (वय ६०) यांच्याकडून ८२ हजार ५३० रुपये किमतीचा ३ किलो ९३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदारांचा सक्रिय सहभाग होता. या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले.
अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरोधात भुईंज पोलीस ठाणे सातत्याने कठोर कारवाई करत असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर करडी नजर ठेवली जात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























