वाई पोलिसांची धडक कारवाई - शेतीपंपाची केबल चोरी करणारे चोरटे गजाआड

शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला - पोलीस प्रशासनाचे मानले आभार

Cable thieves arrested, police, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

शेतीपंपांच्या मोटारीच्या केबल चोरून त्यातील तांबे विकणाऱ्या एका चोरट्याला वाई पोलिसांनी जेरबंद केले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेतीपंपांच्या केबल चोरीचे वाढते प्रमाण रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

दि. ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ दरम्यान तारांगण सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सिद्धनाथवाडी, वाई येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुमारे १०० मीटर लांब निळ्या रंगाची २.५ एमएम जाडीची ३ पेज कॉपर केबल वायर अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे आणि तपास पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले. तपास पथक तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपनीय बातमीदारांच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना, पसरणी रोड, वाई येथे दोन इसम तांब्याची तार विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. यावर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी पसरणी रोडवर सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी आपले नाव समीर सुरेश तुपे (वय २०) आणि राहुल दादाराव पांचांगे (वय २४, दोघेही रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई) असल्याचे सांगितले. १० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तारांगण सोसायटीच्या पार्किंगमधून सदर कॉपर केबल वायर चोरून, ती जाळून त्यातील तांबे विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पो.कॉ. नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, मारोती लोलापोड आणि उमेश लोखंडे यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास अंमलदार मारोती लोलापोड करीत आहेत.

शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त

चौकशीदरम्यान आरोपीने परिसरातील अनेक शेतांमधून केबल चोरल्याची कबुली दिली आहे. या चोरीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच चोरलेले तांबे कोणत्या व्यापाऱ्याला विकले जात होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. आरोपीला अटक झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !