सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि वंचित घटकासाठी केलेल्या कार्याची दखल
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, वंचित घटकासाठी केलेले मोलाचे कार्य आणि लोकसेवेच्या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय व अविरत कार्य केल्याबद्दल प्रतिकूल प्रतिष्ठान वाई व दलित विकास आघाडी वाई यांच्या संयुक्त विद्यमाने व्याजवाडी ता. वाई येथील लोकसेवक म्हणून नावारूपाला आलेले रुपेश लक्ष्मण मिसाळ यांना १८ ऑगस्ट रोजी टिळक ग्रंथालय वाई येथे प्रतिष्ठित ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.
रुपेश मिसाळ यांनी शालेय जीवनातच चमकदार कामगिरी सुरू केली वक्तृत्व स्पर्धा व क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक मिळवून शाळेचे गावाचे नाव उंचावले शालेय जीवनात रुपेश यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली लोकांच्या अडचणी सोडवणे त्यांना एकत्र करून संघटना बांधली जिथे अन्याय तिथे धावून जाऊन न्याय मिळवण्यासाठी रुपेश आघाडीवर असल्यामुळे व्याजवाडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तंटामुक्तीच्या माध्यमातून अनेक वादग्रस्त तंटे मिटवण्यात ते यशस्वी झाले रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदावर वर्णी लागल्यावर कामाचा धडाका चालू ठेवला भागातील गवंडी बिगारी सुतार काम करणाऱ्या कामगारांची बांधकाम विभागात नोंद करून त्यांचे संरक्षण हक्क रोजगार मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
भागात येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांना थंडीत व पावसाळ्यात बचावासाठी दीड हजार ऊसतोड मजुरांना ब्लॅंकेट तसेच कानटोप्या जर्किन यांचे मोफत वाटप केले गावाच्या शेजारी असलेल्या ऐतिहासिक वैराटगडावर एक हजार वृक्षांची लागवड करून गड सदाहरित ठेवला.
न्यू इंग्लिश स्कूल व्याजवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले शाळा नंबर एक वाई येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले आपल्या 25 मे वाढदिवसानिमित्त वेळे येथील गोशाळेतील 1000 जनावरांना गेली आठ वर्षे सलग हजार टन चारा वाटप केला सरकारी दवाखान्यातील रुग्णांना मोफत साहित्य व फळ वाटप करून मायेचा आधार दिला वडील लक्ष्मण आनंदा मिसाळ बांधकाम खात्यात नोकरीस होते ते बुद्धवासी झाल्यावर आई गुंपा यांनी न डगमगता प्रपंचाचा भार जपला पत्नी पुनम व मुले ओम, स्वामिनी यांची खंबीर साथ व मोलाचे सहकार्याने रुपेश यांना प्रेरणा मिळत गेली व ते लोकसेवक झाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमसैनिक रुपेश मिसाळ यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात न्याय मिळाला चा आनंद संपूर्ण वाई तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीमध्ये होत आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सतीश कुलकर्णी वाई पंचायत समिती माजी सभापती विजयसिंह नायकवडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन मधुकर भोसले, वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे नायब तहसीलदार प्रकाश जाधव ज्येष्ठ विचारवंत जयसिंग पवार ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार दिलीप कांबळे वाई तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुपेश मिसाळ यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून आणि समाज माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना रुपेश मिसाळ यांनी व्यक्त केले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच माझी खरी जबाबदारी आहे. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन."
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























