श्री संत शंकर स्वामी महाराजांच्या २८१ व्या फिरत्या नारळी सप्ताहाची तयारी पूर्ण - दोन लाखांहून अधिक भाविक येणार

खंडाळ्यात अखंड हरिनाम सप्ताहाचा महाजागर; ११,१११ किलो साखरेचा महाप्रसाद!

Akhand Harinam week, Chhatrapati Sambhaji Nagar, vaijapur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सुर्यवंशी)
श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्य संत निळोबाराय आणि निळोबारायांचे शिष्य शिऊरचे श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थान (शिऊर फड) यांचा २८१ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडाळा येथे १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण आहे.

सप्ताहाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नियोजन:
भव्य मंडप व थेट प्रक्षेपण: ३५,००० स्क्वेअर फुटांचा भव्य व आकर्षक मंडप उभारण्यात आला असून प्रवेशद्वारावर देखणे पांडुरंग-रुक्मिणी मंदिर आणि संत शंकर स्वामी महाराजांचा भव्य रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एलसीडी स्क्रीन आणि 'संत शंकर स्वामी संस्थान' या युट्यूब चॅनेलवर केले जाईल.
महाप्रसादाचे भव्य नियोजन: २५ ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वितरित केला जाईल. यासाठी तब्बल ११,१११ किलो (१११ पोती) साखरेचा प्रसाद, ५,००० लिटर आमटी आणि गावागावातून येणाऱ्या लाखो भाकरींचे वाटप होईल. आमटी वितरणासाठी ट्रॅक्टर-टँकर आणि १४ मोठी चुलांगणे तयार करण्यात आली आहेत.
भव्य दिंडी सोहळा: २८१ व्या सप्ताहाचे औचित्य साधून मिरवणुकीत २८१ धर्मध्वजधारी, कलशधारी महिला, तुळशीधारी, टाळकरी व मृदंगाचार्य सहभागी होतील. तसेच लेझिम, आदिवासी नृत्य, बँड पथक आणि वारकरी वेशातील २०० विद्यार्थी हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असतील.
२४ तास नामजागर: सप्ताहात अखंड २४ तास प्रहारा भजन, प्रवचन, कीर्तन आणि हरिपाठ चालू राहील.

या सोहळ्यासाठी खंडाळा ग्रामस्थ, सप्ताह समिती आणि विविध घटकांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. विविध राजकीय नेते, मंत्री व खासदार या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता असून, सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा व ज्ञानदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. २५ ऑगस्ट रोजी ह.भ.प. सारंगधर महाराज भोपळे शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.

        -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !