खटाव तालुक्यात तलाठी व कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ कारवाई

A Talathi and a Kotwal were caught in an ACB trap, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे मंगळवारी केलेल्या सापळा कारवाईत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व कोतवाल यांना ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ६३, व्यवसाय शेती) यांना कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था, कराड शाखा पुसेसावळी येथून ५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. या कर्जासाठी तक्रारदारांच्या मिळकतीवर पतसंस्थेच्या नावाचा बोजा नोंदवून देण्यासाठी संबंधित महसूल कार्यालयाकडून लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार ३१ जुलै २०२६ रोजी एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीच्या पडताळणीदरम्यान तलाठी विलास पांडुरंग नागरगोजे (वय ५१), ग्राम महसूल अधिकारी, सजा राजाचे कुर्ले, ता. खटाव आणि कोतवाल जगन्नाथ नामदेव उमापे (वय ४९), सजा राजाचे कुर्ले यांनी सुरुवातीला अनुक्रमे २,५०० व ३,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीनंतर ३ हजार रुपये देण्याचे निश्चित झाल्याचे पंचासमक्ष पडताळणीत निष्पन्न झाले.

यानंतर ४ ऑगस्ट २०२६ रोजी पुसेसावळी येथील मंडळ व तलाठी कार्यालयाच्या इमारतीत सापळा रचण्यात आला. या कारवाईत कोतवाल जगन्नाथ उमापे यांनी पंचांसमक्ष ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तलाठी विलास नागरगोजे यांनाही ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी आंध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपूरे, गणेश ताटे व चालक अजित कर्णे यांचा समावेश होता. या कारवाईस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही माहिती अथवा लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

      -----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !