वाई-पाचगणी दरम्यान पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली

मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत - सामाजिक कार्यकर्त्यांकडून रस्ता मोकळा

A landslide occurred, pasarni ghat, wai, panchgani, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या वाई-पाचगणी घाटात मुसळधार पावसामुळे बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाटातील डोंगराचा मोठा भाग, दगड आणि माती थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरड कोसळल्याचे समजताच परिसरातील काही जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सरकारी मदतीची वाट न पाहता, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील मोठे दगड आणि माती बाजूला सारण्यास सुरुवात केली. त्यांच्या या तत्परतेमुळे रस्त्याचा काही भाग मोकळा झाला असून संथ गतीने वाहतूक सुरू करण्यात यश आले आहे.

घटना घडून बराच वेळ झाला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी अजूनही घटनास्थळी पोहोचलेले नाहीत. पावसाळ्याच्या दिवसांत संवेदनशील घाटांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सज्ज असणे आवश्यक असताना, प्रशासनाचे हे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

घाटात अजूनही पाऊस सुरू असून धुक्याचे साम्राज्य आहे. तसेच डोंगरावरून आणखी दगड खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि वाहने काळजीपूर्वक चालवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !