माळशिरस तालुक्यात खळबळ - शेतमजुराच्या पत्नीची डोक्यात गोळी झाडून हत्या

मालकाच्या मुलावर गुन्हा दाखल

Farm laborer's wife shot dead, bullet fired into her head, akluj, malshiras, solapur,

शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)

माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. शेतमालकाच्या मुलाने शेतात काम करणाऱ्या ३५ वर्षीय विवाहित महिलेची डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सचिन जगन्नाथ देशमुख असे आरोपीचे नाव असून, अकलूज पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

विजय साठे (वय ४०) हे गेल्या १० वर्षांपासून चौंडेश्वरवाडी येथील जगन्नाथ देशमुख यांच्या शेतात पत्नी उषा आणि मुलासह शेतमजुरी करत होते. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास विजय साठे कामासाठी शेतात गेले होते, तर उषा घरची कामे आटोपून दुपारी एकच्या सुमारास शेताकडे निघाल्या होत्या.

त्याचवेळी शेतमालकाचा मुलगा सचिन देशमुख हा शेतातील बांधावर बसला होता. दुपारी सव्वाएकच्या सुमारास अचानक गोळीबार झाल्याचा आवाज झाला आणि त्यापाठोपाठ उषा यांचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने धाव घेतलेल्या पती विजय साठे आणि इतर मजुरांना, उषा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. धक्कादायक बाब म्हणजे, सचिन देशमुख हातात पिस्तूल घेऊन घटनास्थळीच उभा होता.

वडिलांच्या परवानाधारक बंदुकीचा वापर

उषा यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी विजय साठे यांनी अकलूज पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, सचिनने हे कृत्य करण्यासाठी आपल्या वडिलांच्या, जगन्नाथ देशमुख यांच्या परवानाधारक पिस्तूलचा वापर केला.

पोलीस कारवाई

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराची पाहणी केली. संशयित सचिन देशमुख याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा (कलम ३०२) आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने शेतमजुराच्या पत्नीची हत्या कोणत्या कारणावरून केली, याचा तपास पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके करत आहेत. या भीषण घटनेमुळे चौंडेश्वरवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !