पोलीस, होमगार्ड आणि ग्रामस्थांची धाडसी कामगिरी

धाडसी बचावकार्यामुळे एका व्यक्तीला नवजीवन मिळाले.

Giving life to a person, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा तालुक्यातील मर्ढे येथे कृष्णा नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या एकाचे पोलीस, होमगार्ड आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून प्राण वाचवले. या धाडसी बचावकार्यामुळे एका व्यक्तीला नवजीवन मिळाले असून परिसरातून सर्व स्तरांतून या सर्वांचे कौतुक होत आहे.

मर्ढे व आनेवाडी गावांना जोडणाऱ्या पुलावरून सध्या कृष्णा नदीचे पाणी वाहत आहे. पुलालगतच्या स्मशानभूमीच्या परिसरात दारूच्या नशेत असलेले शिवाजी शिंगटे (रा. मर्ढे) यांचा पाय घसरून ते पाण्याच्या प्रवाहात पडले व वाहून जाऊ लागले.

या घटनेची माहिती मिळताच पुलावर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस हवालदार आशिष कुमठेकर, पोलीस शिपाई प्रसाद शिंदे, होमगार्ड करण मोरे आणि किरण खवले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, पोलीस पाटील महेश रोकडे तसेच उपस्थित असलेले स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने अथक प्रयत्न करत संबंधित व्यक्तीला नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी पुलाच्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून बॅरिकेडिंग व सूचना फलक लावण्यात आले आहेत. पुराच्या पाण्यात उतरू नये तसेच नदी व पुलाच्या धोकादायक परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन देखील पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

पोलीस निरीक्षक निलेश तांबे म्हणाले, "पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मर्ढे येथील घटनेत कर्मचारी आणि ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद असून नागरिकांनीही सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे."

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !